गरज नसताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिले गेल्यानं मोठा तुटवडा; मनपा आयुक्तांची धक्कादायक माहिती

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती धुळे महापालिका आयुक्त अजित शेख यांनी दिली. major shortage of remedicivir injections

  • विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे
  • Published On - 16:52 PM, 12 Apr 2021
गरज नसताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिले गेल्यानं मोठा तुटवडा; मनपा आयुक्तांची धक्कादायक माहिती
Remdesivir price cheaper

धुळे: शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी अत्यावश्यक म्हणून असलेले बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड त्याचप्रमाणे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे. खासगी रुग्णालयात गरज नसताना कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती धुळे महापालिका आयुक्त अजित शेख यांनी दिली. (major shortage of remedicivir injections when not needed; Shocking information of Municipal Commissioner dhule)

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळाबाजाराला मोठा चाप

तर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच खासगी रुग्णालयांना मिळणार असल्याने होणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळाबाजाराला मोठा चाप बसणार आहे.

लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनावर प्रतिबंधक असलेल्या लसीचे शिस्तीत नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या 20 केंद्रापैकी काही केंद्रावर लसी संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले होते. मात्र शासनाला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर उद्यापर्यंत लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू होणार असल्याची माहितीही आयुक्त अजित शेख यांनी दिली.

शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट

शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट भयंकर असून धुळ्यासारख्या ठिकाणी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत बाधित मृतांची संख्या देखील वाढू लागल्याने स्थानिक प्रशासन सुद्धा चिंतेत सापडले राज्य शासनाने कडक निर्बंध घालत वीकेंड लॉकडाऊन करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली. मात्र तरीदेखील शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी दुकाने बंद, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान देखील सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांकडून शासन आणि प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली

तर काही बेजबाबदार नागरिकांकडून शासन आणि प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली देखील करण्यात येत आहे. वारंवार प्रशासनाच्यावतीने काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करून देखील काही बेजबाबदार नागरिक विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 30,712 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 26 हजार 235 रुग्ण बरे झालेत आणि त्यापैकी 478 रुग्णांचा मृत्यूदेखील झालाय. तर काल तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला असून, एका आठवड्यात साधारणता दहा ते पंधरा रुग्णांचा मृत्यू देखील कोरोना संसर्गामुळे होताना दिसून येत आहे.

महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण

पालिकेच्या हद्दीत असलेले 13 हजार 841 रुग्ण असून, त्यापैकी 12,515 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीला 1123 कोरोनाबाधित उपचार घेताना दिसत आहेत. 203 रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे.

ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण

ग्रामीण भागात 16 हजार 871 रुग्ण असून, त्यापैकी 13 हजार 720 रुग्ण बरे झालेत, तर 275 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. सद्यस्थितीला 2876 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन मनपा प्रशासनाच्या वतीने वारंवार नागरिकांना शासन प्रशासनाचे नियम पाळण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे, तर येणारे सण साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

मुंबईत लॉकडाऊन झाला तर काय होणार?; तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?

Pune Corona ground report : पुण्यात सक्रिय रुग्ण 52 हजार, ऑक्सिजन बेड 45, ICU बेड शून्य

major shortage of remedicivir injections when not needed; Shocking information of Municipal Commissioner dhule