रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या; माजी मुख्य सचिवांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:03 PM, 11 Oct 2020
रत्नागिरी रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या; माजी मुख्य सचिवांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Nanar Refinery Supporters

रत्नागिरी : येथील रिफायनरीबाबत लवकर निर्णय घ्या, असा सल्ला राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचा अहवाल सरकारने विचारात घ्यावा, असेही सुखथनकर यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबद्दलचा विचार लवकर व्हावा, असा सल्ला सुखथनकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. (Make a decision on Ratnagiri refinery; Former Chief Secretary D. M. Sukthankar advice to CM Uddhav Thackeray)

रत्नागिरी रिफायनरीबाबत तुमची भूमिका काय? असा सवाल टीव्ही 9 ने सुकथनकर यांना केला होता. त्यावर बोलताना सुकथनकर यांनी रिफायनरीबाबत अनुकूलता दर्शवली. द. म. सुकथनकर हे रत्नागिरी रिफायनरीबाबत प्रकल्पग्रस्तांची मने वळवण्यासाठी युती सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचे प्रमुख होते. परंतु रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प सरकारकडून रद्द करण्यात आला.

कोरोना काळातील संकटात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्समध्ये पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळळकर यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींचा समावेश होता.

रोजगार वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी सुरु करण्याची या टास्क फोर्सने शिफारस केली होती. माहिती आणि जनसंपर्क सहसंचालयाच्या महासंवादच्या पेजवर टास्क फोर्सची अधिकृत माहिती देण्यात आली होती. सध्या रिफायनरीला समर्थन वाढत असताना सुखथनकर यांनी सरकारला केलेल्या विनंतीमुळे हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने थेट आव्हान दिलं आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडेल, पण रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प होणारच असं खुलं आव्हान दिलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या दिवशी नाणारची अधिसूचना निघेल, असाही दावा जठार यांनी केला.

संबंधित बातम्या

‘सरकार पडेल, पण रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प होणारच’, भाजप नेत्याचं शिवसेनेला आव्हान

‘नाणार’मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनाच भूखंडाचे श्रीखंड; निलेश राणेंचा दावा

(Make a decision on Ratnagiri refinery; Former Chief Secretary D. M. Sukthankar advice to CM Uddhav Thackeray)