भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त 110 फूट उंचीचे संत तुकाराम महाराजांचे मंदीर

भिवंडी शहरात 110 फूट उंचीचा देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदीराचा देखावा साकारण्यात आला आहे. सध्या शहरात 110 फुटाच्या मंदीराची चर्चा सुरु आहे.

भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त 110 फूट उंचीचे संत तुकाराम महाराजांचे मंदीर

ठाणे : भिवंडी शहरात 110 फूट उंचीचा देहू (Dehu Temple) येथील संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या गाथा मंदीराचा (Gatha temple) देखावा साकारण्यात आला आहे. सध्या शहरात 110 फुटाच्या मंदीराची चर्चा सुरु आहे. भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाच्यावतीने यंदा 31 वा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने दरवर्षी ते वेगवेगळे देखावे येथे साकारत असतात.

हे मंदीर उभारण्यासाठी तब्बल एक महिन्याहून अधिक काळ लागला. तसेच यासाठी कोलकाता आणि ओडिशावरुन आलेल्या दीडशे कामगारांनी मेहनत घेऊन हे मंदीर उभारलं आहे. विशेष म्हणजे हे मंदीर लाकडी बांबू, वासे, कपडा आणि रस्सीच्या सहाय्याने तयार केलं आहे.

विशेषतः म्हणजे या देखाव्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि थर्माकोल या पर्यावरणास घातक असणाऱ्या वस्तुंचा वापर टाळून हा देखावा उभारला आहे. त्यासाठी कोलकाता आणि ओडिशा राज्यातील 150 कुशल कामगार आले होते. त्यांनी 45 दिवस मेहनत करून हा देखावा उभारला आहे. गेल्या 12 वर्षांपासून हे कामगार मंडळाचे अध्यक्ष यांच्या कल्पक कलाकृती साकारण्यासाठी येत असतात.

भिवंडी शहरातील एकात्मतेचा राजा म्हणून या गणपतीची ओळख आहे. याचे कारण असे की, या विभागात अनेक धर्माचे लोक राहतात, हे सर्वजण एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात.

भिवंडी शहर संवेदनशील असल्यामुळे गणपती मंडळाने 20 सीसीटीव्ही लावले आहेत. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *