छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन पडून कर्मचारी जखमी

धुळे: धुळे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करत असताना, एक कर्मचारी खाली कोसळला. त्यामुळे तो जबर जखमी झाला आहे. हा कर्मचारी पुतळ्यावरुन खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळे महापालिकेचे नूतन महापौर चंद्रकांत सोनार यांनी शहरातील सर्व पुतळे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार …

Latest on News, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन पडून कर्मचारी जखमी

धुळे: धुळे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करत असताना, एक कर्मचारी खाली कोसळला. त्यामुळे तो जबर जखमी झाला आहे. हा कर्मचारी पुतळ्यावरुन खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धुळे महापालिकेचे नूतन महापौर चंद्रकांत सोनार यांनी शहरातील सर्व पुतळे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात येत होती. मात्र हा पुतळा स्वच्छ करत असताना कर्मचारी वरुन कोसळल्याने तो जखमी झाला.

दरम्यान, याबाबत टीव्ही 9 मराठीने आयुक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतली. मात्र आयुक्तांना या मोहिमेबद्दल काहीच माहिती नव्हतं. तसंच ही पुतळे स्वच्छतेची मोहीम महापालिकेची नव्हती असंही त्यांनी सांगितलं. मग महापौरांनीच स्वत: ही मोहीम हाती घेतली होती का असा प्रश्न आहे. तसंच याबाबतची माहिती आयुक्तांना दिली का दिली नाही असाही प्रश्न आहे. दरम्यान, जखमी कर्मचारी कोण याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

हा कर्मचारी खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने हातातच उचलून, रिक्षातून रुग्णालयात हलवण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *