आधी अनैतिक संबंध, मग ब्लॅकमेलिंग, महिलेला महागात पडलं!

रत्नागिरी : विवाहित पुरुषाशी अनैतिक संबध ठेवून त्यालाच पैशांसाठी ब्लॅकमेल करणं एका महिलेला चांगलेच महागात पडलंय. अनैतिक संबधातून वारंवार ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. घरी पैसे घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या पोटाच खपाखप चाकू भोसकून, तिचा रागाच्या भरात काटा काढला गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेनंतर हा खून करणाऱ्याच्या आरोपीच्या मुसक्या रत्नागिरीच्या …

आधी अनैतिक संबंध, मग ब्लॅकमेलिंग, महिलेला महागात पडलं!

रत्नागिरी : विवाहित पुरुषाशी अनैतिक संबध ठेवून त्यालाच पैशांसाठी ब्लॅकमेल करणं एका महिलेला चांगलेच महागात पडलंय. अनैतिक संबधातून वारंवार ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करणाऱ्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. घरी पैसे घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या पोटाच खपाखप चाकू भोसकून, तिचा रागाच्या भरात काटा काढला गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेनंतर हा खून करणाऱ्याच्या आरोपीच्या मुसक्या रत्नागिरीच्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्यात. संतोष सावंत असे 38 वर्षीय आरोपीचे नावआहे.

संतोषचा रागाचा कडेलोट झाला आणि त्याच्या हातून खून झाला. संतोषचे 32 वर्षीय महिलेसोबत अनैतिक संबध होते. संतोषच्या गावाजवळचीच ही महिला. पत्नी कामावर गेल्यानंतर संतोषच्या घरी ही महिला येत असे. पहिल्यांदा मैत्री आणि त्यानंतर या मैत्रीतून अनैतिक संबंध निर्माण झाले. अनैतिक संबध असलेल्या महिलेकडून संतोषला रोज धमक्या मिळू लागल्या. आपल्यातले प्रेमसंबध साऱ्या जगाला ओरडून सांगण्याची धमकी ही महिला देत होती. त्याच्या मोबदल्यात शाररिक सुख आणि पैशांची मागणी संतोषकडे केली जात होती. मात्र त्या महिलेकडून संतोषकडे अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी होऊ लागली. ते न दिल्यास त्या महिलेनी ब्लॅकमेलिंगच हत्यार उपसलं. आणि घरातील मानसिक स्वाथ्य बिघडलेल्या संतोषनी ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा काटा काढण्याचा प्लॅन आखला.

संतोष सावंत आणि त्यांची पत्नी या दोन ते अडीच वर्षापासून भाड्याच्या घरात राहातात होते. संतोष ट्रक चालक म्हणून काम करतो तर पत्नी एका हॉटलेमध्ये कामाला जाते. काही महिन्यांपासून अनैतिक संबध असलेली महिला संतोषकडे ये-जा करु लागली होती. संतोषच्या मित्राने त्याची महिलेशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्याचे फोटो महिलेने काढून ठेवले होते. त्या आधारे ती संतोषला वारंवार ब्लॅकमेल करुन पाच हजार, दोन हजार असे पैस उकळत होती. ही महिला गुरुवारी कपड्यांची बॅग घेऊन संतोषच्या घरी आली. यावेळी संतोषची पत्नी कामावर गेली होती. महिला आणि संतोष यांच्यात पैशावरून जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर महिलेने घरातील सुरा घेऊन संतोषवर चाल केली. मात्र संतोषने तोच सुरा घेऊन तिच्या पोटात दोनवेळा भोसकला. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.

कोणालाही काही कुणकूण न लागता संतोष पत्नीला आणण्यासाठी गेला. पत्नीला घेऊन आल्यानंतर घरातील हा प्रकार पाहून तिला धक्का बसला. तिने तडक पोलिसांना याची माहिती दिली.

पैशांसाठी ब्लॅकमेक करणाऱ्या महिलेच्या पोटात धारधार सुरा खुपसत संतोषनी आपली सुटका केली खरी, मात्र कायद्याच्या बेडीत तो अडकला. महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर रत्नागिरी ग्रामिण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. 16 जानेवारीपर्यत न्यायालयाने संतोषला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र रत्नागिरी जिल्हा गेल्या दहा दिवसात तिसऱ्या खुनाने हादरलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *