मनोहर पर्रिकर यांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी : जितेंद्र आव्हाड

ठाणे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं जाणं म्हणजे माझ्या अंदाजाने राफेलचा पहिला बळी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मनोहर पर्रिकर हे अत्यंत अभ्यासू, मनमोकळे साधी राहणी आणि चांगल्या विचारांचे होते, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, राफेलच्या बोलणीनंतर पर्रिकर हे अस्वस्थ होते, त्यानंतर दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून …

मनोहर पर्रिकर यांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी : जितेंद्र आव्हाड

ठाणे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं जाणं म्हणजे माझ्या अंदाजाने राफेलचा पहिला बळी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मनोहर पर्रिकर हे अत्यंत अभ्यासू, मनमोकळे साधी राहणी आणि चांगल्या विचारांचे होते, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, राफेलच्या बोलणीनंतर पर्रिकर हे अस्वस्थ होते, त्यानंतर दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्यांनी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्या नंतर ते कधीच दिल्लीला गेले नाहीत. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांजवळ बोलून दाखवल्या, असा दावाही आव्हाडांनी केलाय.

सर्जिकल स्ट्राईक हा शरद पवार संरक्षण मंत्री असताना देखील झाला. पण आम्ही राजकारणासाठी त्याचा कधी गवगवा केला नाही. परंतु या सरकारने राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा गवगवा केला, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

ठाणे ते कोपरीला जोडलेला जुना पादचारी पूल आणि ठाण्यातील इतर पूल अत्यंत धोकादायक आहेत. सरकारने त्वरित याकडे लक्ष द्यावे अन्यथा, आठ दिवसात हायवे बंद आंदोलन करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

पाहा आव्हाड काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *