ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपनं आत्मचिंतन करावे; अनिल देशमुखांचं टीकास्त्र

अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या नाहीत, तर 100% सांगतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 23:15 PM, 21 Jan 2021
ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपनं आत्मचिंतन करावे; अनिल देशमुखांचं टीकास्त्र

यवतमाळः येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत, असं म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी खळबळ उडवून दिलीय. अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या नाहीत, तर 100% सांगतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. यवतमाळमध्ये अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. (Many NCP Leaders Will Come In The Near Future Says Anil Deshmukh)

ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केलीय. तसेच पदवीधर निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. विधानपरिषद आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा गड ढासळला. या पराभवांमुळे भाजपवर चिंतन करण्याची वेळ आली आहे. नागपुरात झालेल्या भाजपाच्या पराभवाचं चिंतन केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावलाय.

चौकशी केल्यानंतरच सविस्तर बोलेनः अनिल देशमुख

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या बाजूला आग लागली. यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली. चौकशी केल्यानंतरच सविस्तर बोलता येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले. अनिल देशमुख यांनी कोरोना लस, बेळगाव यांसारख्या प्रश्नांनाही हात घातलाय.  बेळगावसंदर्भात सांगायचे झाल्यास बेळगावमध्ये अनेकांनी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्या ठिकाणी तणाव होऊ नये म्हणून बेळगाव सीमेवर बंदोबस्त ठेवलाय, सुरक्षेच्या दृष्टीने दक्ष राहायला सांगितलेय. तसेच नागपूर येथील कारागृहात ड्रग्जची घटना उघडकीस आली. हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा अनिल देशमुख यांनी दिलीय.

कर्तव्य बजावताना राज्यात 330 पोलीस शहीद: अनिल देशमुख

कोविडविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावताना राज्यात 330 पोलीस शहीद झालेत. यवतमाळ जिल्ह्यातही दोन पोलीस शहीद झालेच. त्यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत मिळेल, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रोजेक्ट वन टू नावाने मोहीम सुरू : अनिल देशमुख

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रोजेक्ट वन टू नावाने एक मोहीम चालू करतोय, हा इमर्जन्सी सर्व्हिसेसचा नंबर आहे. एखाद्या ठिकाणी अनुचित प्रकार घडला, दुर्घटना झाली, अत्याचार झाला, अशावेळी यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित होईल. अडीच हजार वाहनांना जीपीएस लावून घटनास्थळी लवकर पोहोचून मदत देण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

अण्णा हजारेंमुळे आंदोलनाला ताकद मिळेलः अनिल देशमुख

2013 मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आंदोलन केले. त्यावेळी देश आंदोलनात उतरल्याचे आपण बघितले. शेतकर्‍यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, केंद्राने ताठर भूमिका घेतली. अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा चांगला निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलनाला नक्कीच ताकद मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

राजकीय हवा बदललीय, भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात; अनिल देशमुखांचा दावा

Many NCP Leaders Will Come In The Near Future Says Anil Deshmukh