भुजबळांच्या फार्महाऊसबाहेर मराठा समाजाचे आंदोलन, भेट न झाल्याने निवेदन लावून परतण्याची वेळ

छगन भुजबळांची भेट न झाल्याने अखेर भुजबळ फार्मला निवेदन लावून परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.(Maratha Activist protest in nashik Chhagan Bhujbal house) 

भुजबळांच्या फार्महाऊसबाहेर मराठा समाजाचे आंदोलन, भेट न झाल्याने निवेदन लावून परतण्याची वेळ

नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र भुजबळांची भेट न झाल्याने अखेर भुजबळ फार्मला निवेदन लावून परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. छगन भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत, असा आरोप केला आहे. तर काही लोक जाणीवपूर्वक माझी प्रतिमा मराठा विरोधक अशी करण्याचे आहे, असा पलटवार भुजबळांनी केला आहे. (Maratha Activist protest in nashik Chhagan Bhujbal house)

मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरुन राज्यभरात वातावरण पेटलं आहे. आज नाशिकमध्ये मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिकजवळील भुजबळ फार्म या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. भुजबळ आपल्या नियोजित बैठकांसाठी बाहेर होते. त्यामुळे त्यांना येण्यास वेळ लागल्याने, आंदोलकांनी भुजबळ फार्मच्या गेटवरच निवेदन अडकवून काढता पाय घेतला. दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली.

माझ्या कोरोनाच्या संदर्भातल्या नियोजित बैठका होत्या. सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता. मला आंदोलकांनी याबाबतची कल्पना दिलेली होती. मात्र तरीही मला मराठा विरोधक असल्याचं चित्र तयार केलं जात असून विष कालवण्याचं काम काही लोक करत आहेत, असा आरोप भुजबळांनी केला आहे.

मराठा आंदोलकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. तसेच परिसरात असलेल्या काही कोव्हिड रुग्णांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. (Maratha Activist protest in nashik Chhagan Bhujbal house)

संबंधित बातम्या : 

इंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू टर्न

एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना ‘हे’ नियम अनिवार्य

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *