Maratha Reservation | 3 कोटी मराठा समाजाची दिशाभूल : मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करुन राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे." (Maratha Kranti Morcha Letter on EWS reservation)

Maratha Reservation | 3 कोटी मराठा समाजाची दिशाभूल : मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा

मुंबई : “मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करुन राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे गोंडस नाव पुढे करुन त्यांची राजकीय अडचण होऊ नये म्हणून 3 कोटी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चाने मांडली. (Maratha Kranti Morcha Letter on EWS reservation)

महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय बुधवारी (23 डिसेंबर) घेतला. मात्र, सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत मराठा क्रांती मोर्चाने पत्रक काढून भूमिका मांडली आहे.

“मराठा समाजाची मागणी नसताना वैयक्तिक याचिकेचा आधार घेऊन मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करुन राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला आहे.”

“सरकारने काही लोकांना पुढे करुन विद्यार्थ्यांची फार अडचण होत आहे असे कारण सांगून औरंगाबाद खंडपीठाच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाची एका PIL च्या नावाखाली मराठा आरक्षणाचा पाया खिळखिळा करण्याचा कट रचला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे गोंडस नाव पुढे करुन त्यांची राजकीय अडचण होऊ नये म्हणून 3 कोटी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे,” अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास ठरवला आहे. त्यानुसार क्रिमिलेअरची अट लावून त्या उत्पनाच्या आतील घटकांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण मिळणार आहे. यामध्ये राजकीय आरक्षणाचा समावेश नाही. आयोगाची शिफारस लक्षात घेऊन भविष्यात आपली राजकीय अडचण होईल यादृष्टीने EWS चा घाट घालून समाजाची दिशाभूल केली जात आहे.”

“आयोगाची महत्त्वपूर्ण शिफारस असताना SEBC आरक्षण राज्य सरकारला SEBC आरक्षण टिकवायचे नाही की काय? म्हणून EWS देऊन समाजात फूट पाडायचे काम होत आहे. आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करुन मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोग ज्या मंत्र्यांच्या खात्यातंर्गत येतो त्या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार जाहीरपणे मराठा समाजाचा समावेश ओबीसीत होणार नाही अशी भूमिका घेत आहे. ही सरकारची भूमिका आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे,” असेही यात नमूद करण्यात आले आहे.  (Maratha Kranti Morcha Letter on EWS reservation)

संबंधित बातम्या : 

अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही : विजय वडेट्टीवार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI