विनायक मेटेंनी रणशिंग फुंकलं; मराठा आंदोलनाचं ठिकाण ठरलं

मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोणताही विचार न करता विविध विभागांत भरतीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केलाय.

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 21:03 PM, 22 Jan 2021
विनायक मेटेंनी रणशिंग फुंकलं; मराठा आंदोलनाचं ठिकाण ठरलं
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम

पुणेः शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मोठी घोषणा केली. महिनाअखेरीस राज्यातील जालन्यातून मराठा समाज आंदोलनाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिलीय. मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोणताही विचार न करता राज्य सरकारनं विविध विभागांत भरतीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केलाय. (Maratha movement will start from Jalna says Vinayak Mete)

राजेश टोपेंच्या जालना मतदारसंघातून मराठा समाज आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यभरात मराठा समाजाला बाजूला ठेवून करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या विरोधात राज्यभरात मेळावे घेतले जाणार असल्याचीही माहिती विनायक मेटे यांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला होता. 25 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली गेली आहे. सुनावणी का पुढे ढकलली गेली? महाविकास आघाडी सरकार गोट्या खेळतंय का? असा संतप्त सवाल विनायक मेटे यांनी केला होता.

नोकरभरती पुढे ढकला

यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच कोर्टात अर्ज सादर करणाऱ्या एमपीएससीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. एमपीएससीचा भरती विरोधातील अर्ज ही जातीयवादी भूमिकाच आहे. मराठा समाजात सरकारच्या धोरणांवर असंतोष आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

एमपीएससीने मराठा उमेदवारांना ‘एसइबीसी’ऐवजी आर्थिक मागास समाजाचे आरक्षण देता येणार नाही, असा अर्ज 20 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल करून राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. राज्य सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीने हा अर्ज कोर्टात सादर केला होता. त्यामुळे मराठा नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या वादाचे पडसाद उमटले होते.

संबंधित बातम्या:

एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार?

सरकारचा मोठा निर्णय, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, वाचा सविस्तर

Maratha movement will start from Jalna says Vinayak Mete