Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाकेंवर दारु पिल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Manoj Jarange Patil : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दारु पिऊन गोंधळ घालण्याचा आरोप आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात दारु पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. ही घटना कालची असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज या संदर्भात पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. लक्ष्मण हाके यांना क्लीन चीट देण्यात आली. रिपोर्ट ओके करण्यात आले असा प्रश्न विचारला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माझ काही म्हणणं नाही असं उत्तर दिलं. “मी सरळ आहे. तुम्ही मला एक दिवस बघत नाहीयत. मागच्या एक-दीड वर्षापासून बघताय. मी ज्याला विरोधक मानतो त्याचा तुकडाच पाडतो. ज्याला मानत नाही, त्याच्यावर बोलत नाही” असं सांगितलं.
“मानत नाही त्याला बोलत नाही, याचा अर्थ घाबरला, भितो असा कोणी काढू नये. लक्ष्मण हाके यांना क्लीनचीट दिली, याच्याशी काही देणं-घेणं नाही. कोणाच्या व्यक्तीगत आयुष्यात पडत नाही, तसे संस्कार मराठ्यांवर नाहीत. एखादा अडचणीत सापडला असेल, तर त्याला आणखी अडचणीत आणण्याचे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. संधी आली की, चेंगरायचा या विचारात मी मोडत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘तेवढा मी शहाणा आहे मला अक्कल आहे’
लक्ष्मण हाके यांनी तुमच्यावर भरपूर टीका केली, मराठ समाजावर टीका केली, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “शेवटी कर्ता-करविता छगन भुजबळ आहे. ओबीसी-मराठा वाद लावायचा तो ठरवतो, कोणी उठायचं, कोणी बसायचं हे तो ठरवतो. दुसऱ्यांना दोष देऊन अर्थ नाही. मला समाजकारण- राजकारण कळतं तेवढा मी शहाणा आहे मला अक्कल आहे, कर्ता-करविता कोण हे माहित आहे. दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही हे त्याच्या समाजाला जनतेला कळतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दसरा मेळाव्याबद्दल काय म्हणाले?
“दसरा मेळाव्याबाबतही ते बोलले. दसरा मेळाव्याचा परिसर खूप मोठा आहे. 600-700 एकरचा परिसर आहे. गडावर खूप लोक येणार, ताकदीने येणार. अठारपगड जातीच लोक येणार. मी गडावर जाऊन विराट समुदायाचं दर्शन घेणार आहे. विजायदशमीच्या निमित्ताने दर्शन घेणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.