आता हिशेब होणार, बदलाच घेणारच…आम्हाला संपवण्यास निघालेला…मनोज जरांगे यांचा एल्गार
maratha reservation manoj jarange: आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले.
maratha reservation manoj jarange: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी विद्यामान सरकार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ले केले. ते म्हणाले, आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असो. आमची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
आता त्यांची वाट लावणार…
सरकार अन् देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी जातात जातात आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु.
मराठा पडाव करणारच…
आमचा समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा लोकच करणार आहे.
लोकांना आता राजकीय लोक नाही. त्यांच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. आम्ही आमच्या मुलांचे भविष्य पाहू. मराठा समाजाने काय पाप केले? तुम्ही त्यांना ७० वर्षांपासून आरक्षण देत नाही. ते लोक खूप खुन्नस करत आहे. त्यांच्या पक्षातील मराठा समाजातील नेत्यांशी ते खुन्नस करत आहे. इतके मुळावर उठण्याची काहीच गरज नव्हती, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज अंतरवाली सराटी मध्ये महत्वाची बैठक होत आहे. विधानसभा निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे किंवा कुणाला पडायचे की, स्वतःचे उमेदवार उभे करायचे हा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.