जळगावात गिरीश महाजनांचं मराठा समाजाकडून जंगी स्वागत

जळगाव: मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता ठिकठिकाणी भाजप नेत्यांच्या मिरवणुका काढल्या जात आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन तसंच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची जळगावात मराठा समाजाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मोलाची, सामंजस्याची तसेच यशस्वी मध्यस्थीची भूमिका बजावल्याबद्दल,  गिरीश महाजन यांचे सकल मराठा समाज […]

जळगावात गिरीश महाजनांचं मराठा समाजाकडून जंगी स्वागत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

जळगाव: मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता ठिकठिकाणी भाजप नेत्यांच्या मिरवणुका काढल्या जात आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन तसंच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची जळगावात मराठा समाजाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात मोलाची, सामंजस्याची तसेच यशस्वी मध्यस्थीची भूमिका बजावल्याबद्दल,  गिरीश महाजन यांचे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने जळगावात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

सकल मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केले होते. त्यावेळी गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती. गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन, मराठा बांधवांशी चर्चा केली होती. तसंच सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन  दिल्याने, मराठा समाजाने हे आंदोलन मागे घेतलं होतं.

मराठा आरक्षण लागू

दरम्यान, मराठा समाजाला आजपासून आरक्षण लागू झालं आहे. कालच राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण लागू झालं. महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर झालं होतं.

संबंधित बातम्या 

SEBC म्हणजेच ओबीसी, हा प्रवर्ग जुनाच आहे : पी. बी. सावंत   

मराठा आरक्षणासाठी थांबवलेली मेगाभरती लवकरच सुरु होणार   

शिक्षकांच्या 24 हजार जागांमध्ये मराठ्यांसाठी 16 टक्के जागा राखीव

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.