Maharashtra News LIVE Update | दहावीबरोबरच बारावी बोर्डाच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

| Updated on: Dec 13, 2021 | 6:06 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या -

Maharashtra News LIVE Update | दहावीबरोबरच बारावी बोर्डाच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. आज परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Dec 2021 09:11 PM (IST)

    सोलापूर

    – सोलापूर – तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीने केली दगडफेक

    – दगडफेकीत चालक रामदास इंगळे जखमी

    – सोलापूर जवळील तळेहीप्परगा येथे घडली घटना

    – चालकावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

    – प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

    – पोलीस अद्याप घटनास्थळी दाखल नाहीत.

    – एम एच 20 पी एल 4114 क्रमांकाच्या एसटी बस मधून साधारण चाळीस प्रवासी तुळजापूरहून सोलापूरसाठी करत होते प्रवास..

  • 12 Dec 2021 09:11 PM (IST)

    नाशिक

    – नाशिकच्या सिंहस्थनगर परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह – तरुण मयत आढळल्याने स्थानिकांनी दिली अंबड पोलिसांना माहिती – तरुणाचा मृत्यू कसा झाला याबाबत अंबड पोलिसांचा तपास सुरू

  • 12 Dec 2021 08:59 PM (IST)

    नाशिक

    - नाशिकच्या सिडको परिसरात टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला - कोयता,चॉपर,फायटर ने केला हल्ला - शिवनेरी गार्डन परिसरात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने केला हल्ला - आपापसातील वादातून हल्ला झल्याची प्राथमिक माहिती - तरुण गंभीर जखमी - संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

  • 12 Dec 2021 08:41 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस

    माईक समोर आलं म्हणून मी जनतेच्या जवळ आहे मी मुख्यमंत्री असताना या परिसरात अनेक समस्या सोडवण्याचा काम अतुलजीने केलं कोरोना काळात जेव्हा शाखा बंद होत्या तेव्हा भाजपचे कार्यकर्त्यांनी जेवण व अन धान्य वाटत होते सरकारच्या सरकारवर अतुलजीने नेहमीच हल्ला बोल केला आज आपण पाहतो आहे सरकार बदलल्यावर कोरोना काळात करोडो भ्रष्टाचार झालं

    आपल्या कंपन्यांना कंत्राट दिले

    कोविडच्या माध्यमातून पैसा कसा कामवायचा सरकार ही योजना करत होती

  • 12 Dec 2021 08:06 PM (IST)

    बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    दहावीबरोबरच बारावी बोर्डाच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

    नियमित शुल्कासह 18 डिसेंबरपर्यंत भरता येणार परीक्षा अर्ज,

    तर 24 तारखेपर्यंत विलंब शुल्कासह भरता येणार अर्ज

    माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढलं परिपत्रक

  • 12 Dec 2021 07:11 PM (IST)

    जळगाव

    सरपंच परिषदेचा महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम

    वित्त आयोगाच्या रकमेत कपात करण्यात येवू नये यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरपंच आक्रमक

    हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती ठेवणार बंद

    सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे इशारा

  • 12 Dec 2021 07:11 PM (IST)

    पुणे

    राज्यात आज एका ओमिक्रॉन बाधिताची नोंद

    5 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आला होता रुग्ण

    नागपूरमधील 40 वर्षीय पुरुषाला झाली लागण,

    संपर्कातील 30 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह

    नागपूरमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू

  • 12 Dec 2021 07:11 PM (IST)

    नाशिक

    - थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये होणार दाखल... - राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 9 वाजता जनहित कक्ष व विधी विभाग मध्यवर्ती कार्यलयाच होणार उदघाटन - 10 वाजता मध्यवर्ती कार्यलयात होणार जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम

  • 12 Dec 2021 04:54 PM (IST)

    नसीम खान 121

    - एमआयएम ने सर्व नियम मोडले.. ओवेसी स्वता बॅरिस्टर आहेत… एमआयएम ही एक गाडी आहे… ज्यात भाजप जेवढे पेट्रोल टाकते एतेवढं एनआयएम बोलतं

    देशात ज्या ठीकाणी निवडणुका येतात तेव्हा हे तिथे जातात … मतांचं राजकारण करतात… इथेही हेच केलंय…

    - एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहीत आहे , मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली…आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आलेत

    - आम्ही मुस्लीम आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवला, रस्त्यावर उतरलो तेव्हा यांचे आमदार , खासदार यांनी साथ दिली नाही, आत्ता कळवळा कशासाठी… एमआयएमला इतकं महत्व देण्याची गरज नाही…

    - वक्फ बोर्डाची जमीन ही कुणासाही देता येत नाही, ती जमिन कुणासाही ट्रांश्पर होत नाही, ९३ हजार एकर जमिन आहे ती आहे तिथेच आहे, दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे…

    - राहूल गांधी कायदा मोडणार नाहीत त्यांना कायदा माहीत आहेत…ओवेसी बॅरिस्टर आहेत त्यांनी कायदा मोडला, राजस्थान मध्ये आज रॅली नाही रैला निघाला जनादेश वाढतो आहे

    - शरद पवार देशाचे जेष्ट नेते आहेत त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आपल्या नेत्याने नेतृत्व करावे हे वाटते यात गैर काही वाटत नाही

    - कांग्रेसशिवाय तिसरी आघाडी होऊच शकत नाही, हे अटळ सत्य आहे…

  • 12 Dec 2021 04:47 PM (IST)

    चंद्रपूर

    2024 मध्ये पवारांनी नेतृत्व करावं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणी करावे हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे मत देशातील सामान्य जनतेने मोदींना आपला नेता मानला असल्याचे प्रतिपादन विरोधकांनी मोदींना शिव्या दिल्या मात्र त्यांनी कधीही प्रतिकार केला नाही ते आणून दिले लक्षात,

    2024 मध्ये देखील मोदीच पंतप्रधान होतील असे सांगत मोदी है तो मुमकिन है, राहुल है तो मुश्किल है असा लगावला टोला

  • 12 Dec 2021 04:38 PM (IST)

    नितीन गडकरी

    कोविड च्या सगळ्या नियमांचं पालन करत हे आयोजन केल जाणार आहे ..

    सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार

    स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार

  • 12 Dec 2021 04:31 PM (IST)

    पुणे

    म्हाडा पेपरफुटी प्रकरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता प्रेस

    आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या पेपरफुटीचा तपास करताना म्हाडाच्या पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला

    सायबर सेलला मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद, जालना, बीड, पुणे ठाणे परिसरात पथक तपासासाठी पाठवली

    औरंगाबाद परिसरात टार्गेट करियर पॉईंट संस्थेचा अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव इतर पेपर फुटीमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली

  • 12 Dec 2021 04:29 PM (IST)

    नागपूर

    नागपुरात ओमायक्रोनच्या पहिल्या रुग्णाची नोंद

    पुरुष रुग्ण असून ते नुकतेच वेस्ट आफ्रिका या देशाचा दौरा करून नागपूरला परतले आहेत

    रुग्णाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे

  • 12 Dec 2021 04:29 PM (IST)

    नितीन गडकरी 

    नागपुरात सांस्कृतिक मोहत्सव च आयोजन मी सुरू केलं होतं

    मात्र दोन वर्षे कोविड मुळे ते होऊ शकलं नाही

    या वर्षी हे आयोजन केले जात आहे

    क्रीडा महोत्सव च पण आयोजन केल जात आहे

    या सांस्कृतिक महोत्सव च्या माध्यमातून अनेक कलाकारांना संधी मिळते

    या वर्षी आमच्या समितीने नेशनल , इंटर नेशनल कलाकार बोलावले

    अमिताभ बच्चन यांच्याशी मी बोललो पण थोड्या अडचणी आहे

    संजय दत्त 17 डिसेंबरला उद्घाटन करणार

  • 12 Dec 2021 04:28 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड मंत्री

    म्हाडा पेपर प्रकरण

    म्हाडाचे अधिकारी आणि पोलिस काल रात्री बोलत होते

    या मध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

    पेपर घेऊन नंतर कळले असते तर काय झाले असते

    पोलिसांनी ती टोळीचा पर्दाफाश केला

    भविष्याच्या दृष्टी ने महाराष्ट्र मध्ये जी टोळी कार्यरत आहे ते उध्वस्त करायला लागेल

    पोलिसांनी गोपनियेताचा भंग झाला आहे

    पेपर फुटी नाही

    गोपनीयतेचा भंग झाला आहे

    लॅपटॉप मध्ये पेपर ठेवले ते गोपनीयतेचे भंग आहे

    महाराष्ट्र मधील सर्व दलाल एकच आहेत

    खाजगी सवस्थेकडून हा प्रकार झाला

    पुढे स्वतःहून म्हाडा परीक्षा घेणार

    खाजगी कडे काम नसणार

    समस्त महाराष्ट्र मधील विद्यार्त्यांच्या माफी मागतो

    ज्या विद्यार्त्यांची फी घेतली जाईल त्यांची फी म्हाडा परत करणार

    नालायक लोक याना थारा देऊन नये

    ही परीक्षा झाली असती तर त्यांच्यावर अन्याय झाला असता

    विद्यार्त्यांच्या हिताचे नाही नुकसान झाले असते

    मी आजपर्यंत इतिहासात कणखर भूमिका कोणी घेतली असे दिसले का

    महाराष्ट्र मधील हित आणि विद्यार्त्यांच्या नाते जवळचे आहे

    आज मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले

    सरकार आहे

    वाशीलच्या टॅटू मंत्रालय मध्ये जातात

    आम्ही हिमत दाखवण्याचे काम केले म्हणून डिकल्यर केले

    पुढे परीक्षा कधी होणार हे म्हाडा ठरवेल

    आता जी पकडली गेले ली कंपनी 2 लाख पोलिसांच्या परीक्षा घेतली आणि व्यवस्थित पार पडली

    मी जबाबदारी घेतली

    पोराच्या आयुष्याचा खेळ झाला असता ते थांबले

  • 12 Dec 2021 03:12 PM (IST)

    कल्याण

    चिकणघर परिसरातील हायप्रोफाइल निखिला हाइट्स मधील धक्कादायक प्रकार

    घरात सापडला 55 वर्षीय इसमाचा मृतदेह

    प्रमोद बनोरिया अस या मयत इसमाच नाव

    प्रमोद यांची पत्नी कुसुम  व मुलगा लोकेश  गंभीर जखमी

    दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू

    कल्याणच्या महात्मा फुले पोलिस घटना स्थळी दाखल

    कुटुंबात वाद झाल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती

    कुणी कुणाला मारलंय हे अजून अस्पष्ट

  • 12 Dec 2021 03:11 PM (IST)

    बुलडाणा

    अज्ञात व्यक्तीने चिखली आगाराची बस फोडली,

    एसटी बस वर केली दगडफेक,

    दगडफेकीत एसटी बस चा काच फुटला,

    दगडफेक करणारा अंदाजे 25 ते 40 वर्ष वयाचा,

    बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकातील घटना,

    बस बुलडाणा वरून चिखली ला जात होती,

    बस क्रमांक एम एच 40, 5345 फोडली,

    बसमध्ये 3 प्रवाशी होते

  • 12 Dec 2021 03:11 PM (IST)

    प्रविण दरेकर 121

    कंस काय पाटील अशाप्रकारचे विधान करण्यावाचून छगन भुजबळ यांना गत्यंतर नाही कारण ज्यांच्या जीवावर नेतृत्व केलं राजकारण केलं पदवी मिळवली त्या ओबीसींसाठी काही आपण करू शकत नाही या हतबलतेनं छगन भुजबळांचे अशाप्रकारे उद्गार आलेले आहेत

    कोर्टाने या सरकारला अनेकदा रिमाइंडर पाठवली, प्रक्रिया पुर्ण करा आणि त्याच्या कडे दुर्लक्ष झाल्याने कोर्टाला निर्णय घ्यावा लागला, केवळ दिखावा करण्याचं काम ओबीसींच्या साठी अध्यादेश काढून करण्यात आलं जे

    सरकारची मानसिकता ओबीसींच्या बाबतीत नाही आणि ओबीसींचे नेतृत्व आता तुमच्या काळात पूर्ण करा

    देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे आहेत , ओबीसींच्या साठी भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला आंदोलनं केली आणि समाजाला न्याय सर्वकाही देण्याचं काम भाजपच करेल

    गोपीनाथ मुंडे साहेबांचा नाव सांगून आपल्या संस्कृतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका आत्ता त्यांच्याशी एकत्रितपणे समान किमान कार्यक्रम अंगलट येतोय

    नवाब मलिक यांनी सभागृहात मुस्लिम आरक्षण जाहीर केलं पण लगेचच उद्धवजी ठाकरे यांनी त्याला समर्थन दिलं नाही

    ओवेसी त्याठिकाणी भूमिका घेतात याचा अर्थ महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय ते समजतंय…. मला वाटत सत्यता पडताळून वस्तुस्थितीची आढावा घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेणे अपेक्षित आहे …

    मला वाटतं तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे कर अशी मनिआचा गत… भारतीय जनता पार्टीवर खापर फोडायचं आता हा सुनियोजित प्लान आहे…

    पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

    संजय राऊत यांनी जाहीर करावं की सोनिया गांधी या विरोधी पक्षाला पर्याय असतील, की ममता बॅनर्जी पर्याय असतील की पवार साहेब असतील….

    एका बाजूला ममताला आणायचं ममता गेल्यावर काँग्रेस नाराज झाला म्हणून दिल्लीला जाऊन पाय पकडायचे मग आता नेतृत्व करणार कोण आहे

    मोदी साहेबांवर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे , आम्ही ३०० पार केली, आणखी दहा-पंधरा वर्षे तरी मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार चालेल…

  • 12 Dec 2021 03:11 PM (IST)

    जळगाव

    जळगाव जिल्ह्यातील नियम पाळण्याचे आवाहन करणारे सर्व सरपंचांकडुन कोरोना नियमांचे उल्लंघन

    जळगावातील सरपंच मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व सरपंच बीना मास्क

    राज्यातील एकीकडे अोमायक्रॉनचे संकट अोढवले असतांना दुसरीकडे ग्रामस्थांना नियम पाळण्याचे आवाहन करणारे लोकनियुक्त सरपंचा नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे.

    जळगावात आयोजित सरपंच मेळाव्यात जिल्हाभरातील सर्व सरपंच विना मास्क उपस्थित असल्याचे दिसुन आले.

    दिव्याखालीच अंधार या म्हणीप्रमाणे गावाचा प्रमुखच जर नियमांचे पालन करणार नसेल तर ग्रामस्थ काय नियम पाळणार, सरपंचांना ओमायक्रॉनसह कोरोनाचा धोका नाही का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

  • 12 Dec 2021 03:10 PM (IST)

    नितेश राणे

    किशोरी ताईबद्दल जे आशिष शेलार यांनी म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचलेली आहे

    रात्रीच्या वेळेस यायचे बँनर लावायचे आणि स्वतःला वाघ म्हणून म्याव म्याव करायचं ही आता शिवसेना झालेली आहे

    नाच्याचा उरलेला पक्ष शिवसेना ज्या पक्षात वरपासून खालपर्यत सर्व नाचेच भरलेले आहेत

    पुढच्या वेळी बॅनर लावताना ज्यांनी बॅनर लावलेत त्याची खाली नावे दिली असती तर नाचे कशाला म्हणतात हे आम्ही दाखवून देऊ

  • 12 Dec 2021 03:10 PM (IST)

    डोंबिवली

    भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला धक्काबुक्की करत त्याची गाडी फोडली

    भाल गावात घडला प्रकार

    अमित चिकणकर अस या पदाधिकाऱ्याचे नाव

    भाजप पक्षाचा गावात का विस्तार करतो याचा राग काढण्यासाठी हल्ला करण्यात आल्याचा आरोप

    हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल वादवादीची घटना सीसीटीव्हीत कैद

  • 12 Dec 2021 03:09 PM (IST)

    नांदेड

    नांदेड जिल्ह्यातील शाळा उद्या पासून होणार सुरू ग्रामीण भागात पहिली ते चौथी मनपा हद्दीत पहिली ते सातवी चे वर्ग होणार सुरू 3 हजार 115 शाळांत तीन लाख विद्यार्थी शिक्षण विभागाने काढले आदेश कोव्हिड नियमांचे पालन करुन शाळा होणार सुरू

  • 12 Dec 2021 03:09 PM (IST)

    शरद पवार

    - मी 50 वर्षाचा झालो त्यावेळी सहकार्यांनी वाढदिवस आयोजित केला होता...

    75 वर्षाचा झालो त्यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत वाढदिवस झाला...

    12 डिसेंबर माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस

    मी अंतकरणापासून सगळ्यांचा माझ्या घरातील अनेक लोकांचा 12 डिसेंबर हा जन्मदिवस आहे...

    पक्ष लहान, मर्यादित असतील तरीही बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आहेत

    लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की राष्ट्रवादी हा पर्याय असेल अशी बांधणी करायची आहे...

    देशात राज्यातील लोक शेती करतात..

    - मी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्याकडे एक फाईल आली..

    ब्राझील वरून धान्य आयात करण्याची फाईल होती..

    शेतीप्रधान देशात दोन वेळेचे अन्न मिळू शकत नाही मला वाईट वाटले..

    मी स्वाक्षरी केली नाही..

    अस्वस्थ माणसांशी समरस होणार कार्यकर्ता व्हायला हवा...

    समाजावर जे अन्याय अत्याचार झाले त्याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हवी..

    प्रत्येक घटक देशाचा चेहरा बदलू शकतो...

    औद्योगिक कामगार,शेतमजूर,माथाडी कामगार यांना सन्मान द्यायला हवा...

    परदेशातुन धान्य आयात करण्यासाठी त्यावेळी मी जड हाताने स्वाक्षरी केली..

    मात्र नंतर हा देश 18 देशांना अन्न धान्य पुरवणारा देश झाला...

    हे आपल्या शेतकऱ्यांनी केले

    बाळासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली पण बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढे होती

    जल विद्युत विभागाची जबादारी बाबासाहेब आंबडेकर यांच्यावर दिली होती..

    भाकरा नागल सारखी धरणे यांच्या पाण्याचा वापर, वीज निर्मिती याचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता...

  • 12 Dec 2021 01:47 PM (IST)

    वाढदिवसाच्या कार्यक्रमात पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

    दरम्यान आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना पवारांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. मी जेव्हा 50 वर्षांचा झालो तेव्हा विदर्भातील लोकांनी वाढदिवसासाठी पुढाकार घेतला. मी जेव्हा 61 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा भुजबळांनी माझ्या वाढदिवसासाठी पुढाकार घेतला. माझा तो वाढदिवस वाजपेयींच्या उपस्थितीत पार पडला होता. मी जेव्हा 75 वर्षांचा झालो तेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती  पंतप्रधान सर्व केंद्रीय मंत्री सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिल्लीत झाला होता. हे तीनही वाढदिवस कायम माझ्या लक्षात राहिले आहेत. मात्र आता वयाच्या 81 व्या वर्षी असा कार्यक्रम साजरा करणे मनाला पटले नाही. परंतु पक्षातील सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे मी कार्यक्रमाला तयार झालो. त्या सर्वांचे आभार मानतो असे पवार यांनी म्हटले आहे.

  • 12 Dec 2021 01:34 PM (IST)

    वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

    मुंबई : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वरळीतील नेहरू सेंटरमध्ये भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. शरद पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशा सर्वच मोठ्या नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 12 Dec 2021 01:07 PM (IST)

    गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा यांचा कार्यकर्त्यांशी संवाद, गोपीनाथ गड प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संकल्प

    आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  गोपीनाथ गड गावा-गावात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांची जयंती सेवेसाठी समर्पीत असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसावरून धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. मला एका कार्यकर्त्यांनी सांगितले की, परळीमध्ये पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे पोस्टर लावण्यात आले आहेत. तर मी त्याला म्हणाले की असूदेत आपली जयंती ही लोकांच्या सेवेसाठी आहे. असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

  • 12 Dec 2021 10:39 AM (IST)

    MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक

    म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांची कारवाई सुरु असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे. आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपरही फुटणार होता, असा दावा केला जात आहे. सायबर पोलिसांची सतर्कता आणि एमपीएससी समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. रविवारी तिन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली.

  • 12 Dec 2021 10:35 AM (IST)

    महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; बहुजनांच्या मुलांकडे दुर्लक्ष, म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

    म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाच्या व इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता  एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजन मुलांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

  • 12 Dec 2021 08:16 AM (IST)

    पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भात खोडसळ घोषणा, फॉरवर्ड करु नका

    क्रिप्टो करन्सीवर (Crypto Currency) देशात गोंधळाची स्थिती असतानाच, आणि सरकारनं अशा करन्सीला मान्यता द्यायला नकार दिलेला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. (PM Modi tweeter account hacked) मध्यरात्रीनंतर हॅकर्सनी हा प्रताप केलाय. मोदींच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉईनच्या संदर्भात ट्विट केलं गेलंय. त्या ट्विटमुळे खळबळ माजली. कारण हे ट्विट सरकारनं बिटकॉईन्सच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याच्या एकदम उलटं आहे. पण नंतर नरेंद्र मोदी यांचं हे ट्विटर हँडल आता पुन्हा सुरक्षित केलं गेलंय.

Published On - Dec 12,2021 7:56 AM

Follow us
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.