मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह, अजित पवारांकडून योजना गुंडाळण्याचे संकेत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने देण्यात (marathwada water grid project stop) आले आहेत.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह, अजित पवारांकडून योजना गुंडाळण्याचे संकेत
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 7:01 PM

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने देण्यात (marathwada water grid project stop) आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगिती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून या निर्णयला भाजपकडून विरोध दर्शवला जात आहे.

मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी फडणवीस सरकारने वॉटर ग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना आखली होती. या योजनेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आलं होतं. या योजनेसाठी अंदाजे 10 हजार कोटी दिले होते. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणचं पाणी कोरडवाहू भागात आणण्याची ही योजना होती.

मात्र अजित पवार यांनी या योजनेच्या व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तज्ज्ञांनी या योजनेत योग्य व्यवहार झाला नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे इतर योजनेप्रमाणे ही योजना देखील राज्य सरकार गुंडाळणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या आरोग्यावर देखील होतो. मराठवाडाची वॉटर ग्रीड योजना व्यवहारिक नसेल, पण ती बंद केल्याने लोकांच्या घशाला कोरड पडेल त्याचं काय? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला (marathwada water grid project stop) आहे.

काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड? (What is marathwada water grid project)

  • कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगांच्या पाण्याचं एकत्रित ग्रीड करण्यात येईल.
  • दुसऱ्या टप्प्यात दमनगंगा-पिंजाळ, तापी-नार-पार आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.
  • मराठवाडा ग्रीडमध्ये 1 हजार 330 किलोमीटर मुख्य पाईपलाईन असेल. यात 11 धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव, ) लूप पद्धतीने जोडण्यात येतील.
  • त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईप (Secondary) लाईन प्रस्तावित आहे.

प्रस्तावित ग्रीडची ठळक वैशिष्ट्ये

  • लूप पद्धतीमुळे एका ठिकाणाहून पाणी उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या ठिकाणचंही पाणी देता येईल.
  • दोन्ही दिशांना पाणी वाहून नेण्याची (उलट प्रवाह-Bidirectional) सुविधा असल्यामुळे दोन्ही बाजूंनी एका पाईपलाईनद्वारे पाणी हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • एखाद्या साठ्यात अतिरिक्त पाणीसाठा असेल, तर तो पाईपलाईनद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या धरणात नेला जाईल. उदा. जायकवाडीतील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलं जातं. त्याऐवजी ते इतर धरणात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो.
  • भविष्यात उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून पाणी देणे प्रस्तावित आहे.
  • मुख्य पाईपलाईनपासून जलशुद्धिकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.
  • प्रस्तावित दुय्यम पाईपलाईनद्वारे 20 किलोमीटर परीघातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांना ठोक स्वरुपात दुय्यम पाईप लाईनद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.

योजनेची सद्यस्थिती

मराठवाड्यातील 10 प्राथमिक संकलन अहवालापैकी 8 जिल्ह्यांसाठी 8 प्राथमिक संकलन अहवाल, तसेच मराठवाड्याकडे इतर खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी 2 प्राथमिक संकलन अहवाल प्रस्तावित आहेत. त्यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी 2 पीडीआर मेकोरोटकडून प्राप्त झाले आहेत.

वाचा – दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार

जिल्हा औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकूण किंमत 2 हजार 764 कोटी 46 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईपलाईन 737 कि.मी. आणि 4 जलशुद्धिकरण केंद्राची एकूण क्षमता 396 दशलक्ष लिटर असेल.

जिल्हा जालना

जालना जिल्ह्यासाठी एकूण किंमत 1 हजार 529 कोटी 08 लक्ष आहे. त्यामध्ये एकूण पाईपलाईन 458 कि.मी. आणि 3 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 149 दशलक्ष लिटर असेल.

जिल्हा बीड

बीड जिल्ह्यासाठी एकूण किंमत 4 हजार 801 कोटी 86 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईप लाईन 1078.61 कि.मी. आणि 5 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 255 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.

या कामाचं नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार (What is marathwada water grid project) आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.