Corona Virus : कोरोनाचा धसका, कोल्हापुरात शिंकणाऱ्या बाईकस्वाराची दाम्पत्याकडून धुलाई

कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला (Couple beaten man due to sneeze kolhapur) आहे.

Corona Virus : कोरोनाचा धसका, कोल्हापुरात शिंकणाऱ्या बाईकस्वाराची दाम्पत्याकडून धुलाई

कोल्हापूर : कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला (Couple beaten man due to sneeze kolhapur) आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. याच दरम्यान कोल्हापुरात एकजण दुचाकीवरुन जाताना शिंकल्याने एका दाम्पत्याने दुचाकीस्वाराची धुलाई केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद (Couple beaten man due to sneeze kolhapur)झाला आहे.

कोल्हापुरातील गुजरी गल्लीत ही घटना घडली. एक दाम्पत्य दुचाकीवरुन जात असताना अचानक बाजूला असलेला दुचाकीस्वार शिंकला. त्यामुळे रागात दाम्पत्याने दुचाकीस्वाराला मारहाण केली. या घटनेमुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने भारतातही शिरकाव केला आहे. त्यासोबत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकजण या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क किंना तोंडाला रुमाल बांधून फिरत आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 45 वर पोहोचला आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून हा आजार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तर लोकांना घरा बाहेर पडणे टाळा असेही राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

संबधित बातम्या : 

कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव, दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *