ही बातमी वाचा, पार्थ पवारांचा तुम्हाला अभिमान वाटेल!

उरण (रायगड) : देशभर सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अनेक ठिकाणी उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळे पद्धतीने सामान्य लोकांना काळजी घेत असतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया देऊन नेटिझन उमेदवारांना हैराण करुन सोडत आहेत तर कुठे सत्य दाखवून तोंडघशी पाडत आहे. अशाच प्रकारे राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या पार्थ पवारांना सुद्धा विविध […]

ही बातमी वाचा, पार्थ पवारांचा तुम्हाला अभिमान वाटेल!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

उरण (रायगड) : देशभर सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अनेक ठिकाणी उमेदवार प्रचारासाठी वेगवेगळे पद्धतीने सामान्य लोकांना काळजी घेत असतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया देऊन नेटिझन उमेदवारांना हैराण करुन सोडत आहेत तर कुठे सत्य दाखवून तोंडघशी पाडत आहे. अशाच प्रकारे राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या पार्थ पवारांना सुद्धा विविध कारणांनी ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मात्र, पार्थ पवारांबाबत एक प्रसंग समोर आला आहे, जे वाचून, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार हे एप्रिल रोजी उरण परिसरात दौऱ्या दरम्यान न्हावे गावात जात असताना रस्त्यात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र त्या गंभीर जखमी तरुणाला कोणतीच मदत रस्त्यावर उपलब्ध होत नव्हती. मात्र अपघातग्रस्त तरुण दिसताच पार्थ पवार यांनी आपला ताफा थांबवला. जखमी तरुणाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे लक्षात येताच, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पार्थ पवार यांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तातडीने त्या जखमी तरुणाची दखल घेतली. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी गाडी उपलब्ध करून देत, त्यांनी गंभीर जखमी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली.

पार्थ पवारांचं कौतुक

त्या तरुणाच्य दुचाकीला धडक देणाऱ्या चालकाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नियोजित कार्यक्रमाला महत्व न देता पार्थ पवार यांनी माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडवले. त्यामुळे परिसरात पार्थ पवार यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहेत.

निवडणुका प्रचार आणि गाठीभेटी या होतच राहतील मात्र गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे प्राण वाचवणे हीच माणुसकी असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निवडणूक होईपर्यंत प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. मात्र लोकप्रतिनिधी, हायप्रोफाईल व्यक्ती, मोठे शासकिय अधिकारी यांचे माणुसकीच दर्शन अशाच काही प्रसंगातून घडत असते. भर उन्हात तडफडत असलेल्या गंभीर तरुणाला मदतीचा हात देऊन सर्वच तरुणांसमोर पार्थ पवार प्रचार, सभा अशा काही घटनांपुढे महत्व नसते हे दाखवून दिले.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.