नितीन गडकरींच्या प्रचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नागपुरात

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात महिला मेळाव्याला संबोधित केलं. गडकरींना मत देण्याचं आवाहन करत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. शिवाय काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोहींना मदत करणारा असल्याचंही त्या म्हणाल्या. एकीकडे काँग्रेस देश प्रेम दाखवते, दुसरीकडे देशाद्रोह्यांच्या फायद्याचं बोलतात. हाच फरक आहे चौकीदार आणि राजपुत्रात, म्हणून मोदींना पंतप्रधान बनवा, …

नितीन गडकरींच्या प्रचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नागपुरात

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नागपुरात महिला मेळाव्याला संबोधित केलं. गडकरींना मत देण्याचं आवाहन करत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. शिवाय काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोहींना मदत करणारा असल्याचंही त्या म्हणाल्या. एकीकडे काँग्रेस देश प्रेम दाखवते, दुसरीकडे देशाद्रोह्यांच्या फायद्याचं बोलतात. हाच फरक आहे चौकीदार आणि राजपुत्रात, म्हणून मोदींना पंतप्रधान बनवा, असंही त्या म्हणाल्या.

महिलांसाठी मोदी सरकारने मोठी काम केली आहेत. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या जीवनात प्रकाश आणण्याचं काम केलं. पंतप्रधानांच्या इच्छाशक्तीमुळे महिलांना प्रसूती काळात 26 आठवड्यांची सुट्टी मिळते. महिलांना रोजगारासाठी मुद्रा लोन दिलं जात आहे. 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार झाला तर आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद केली, असंही सुषमा स्वराज म्हणाल्या.

मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करता आली असती. मात्र त्यावेळच्या सरकारने ते केलं नाही. मोदी सरकारने ते करून दाखवलं. आमचे सरकार गेल्या 5 वर्षात परदेशातून 2 लाख 26 हजार पेक्षा जास्त लोकांना सुखरूप सोडवून आणलं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, बाकी पक्षाच्या लोकांना चिंता असते आपल्या मुलांना रोजगार कसा मिळेल. आम्हाला चिंता आहे आमच्या गरीब मुलांना रोजगार कसा मिळेल. मी आधीपासून कार्यकर्त्यांमध्ये राहिलो. त्यांच्यासोबत फिरलो, त्यामुळे माझे कार्यकर्ता मला राष्ट्रीय नेता समाजायला तयार नाही. ते मला गल्लीतील आपला जवळचा नेताच समजतात, असंही गडकरी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *