विदेशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या डोसचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा; पालकमंत्र्यांच्या सूचना

विदेशातील वाढत्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लसीच्या पहिल्या डोसचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

विदेशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या डोसचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा; पालकमंत्र्यांच्या सूचना
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी आढावा बैठक घेतली.


नाशिकः विदेशातील वाढत्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लसीच्या पहिल्या डोसचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

पालकमंत्री भुजबळ यांनी आज रविवारी येवला आणि निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना आढावा बैठक येवला संपर्क कार्यालयात घेतली. यावेळी बोलत होते. बैठकीला येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, तहसीलदार शरद घोरपडे, नायब तहसीलदार पंकज मगर, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उमेश पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, डॉ सुजीत कोशिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोंगरे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, विदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत आहे. त्यामुळे अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. येवला तालुक्यात एकूण 88 तर येवला शहरात 54 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढवण्याबरोबर भर द्यावा. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे देखील सुरू करण्यात यावीत. विकास कामांना अधिक गती देण्यात यावी. अतिवृष्टीसाठी येवल्यात 43 तर निफाड तालुक्यात 3 कोटी मदत निधी प्राप्त झाला आहेत. दीपावलीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

नाशिक – औरंगाबाद रस्ते दुरुस्ती लवकर करा

पालकमंत्री म्हणाले, नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही, यासाठी अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याचे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. रस्ते दुरुस्ती करताना अपघात झाले तर निष्काळजी पणाचा ठपका ठेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. येवला तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांचा एकूण लक्षांक एकूण 75 कोटी होता. या हंगामात लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन आतापर्यंत एकूण 84 कोटी 28 लक्ष 31 हजार इतके पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे सांगून यावेळी निफाड तालुक्यातील पीक कर्जाचा देखील आढावा पालकमंत्रीभुजबळ यांनी घेतला.

इतर बातम्याः

हुरहुर लावणारा पिंपळपार पुन्हा बहरणार; दिवाळी पाडव्याला नाशिकमध्ये पंडित हरीश तिवारींची मैफल!

आन तिरंगा शान तिरंगा, फडकत ठेवू नभांगणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे नाशिक जिल्ह्यात जोरदार आयोजन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI