कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, 8 तास वाहतूक बंद

कोकण रेल्वेवर आज मध्यरात्री 11.45 पासून विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार (Konkan railway mega block) आहे.

कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, 8 तास वाहतूक बंद
Follow us
| Updated on: Dec 27, 2019 | 3:34 PM

रत्नागिरी : कोकण रेल्वेवर आज मध्यरात्री 11.45 पासून विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार (Konkan railway mega block) आहे. कोकण रेल्वे मार्गावरील निवसर ते आडवली रेल्वे स्थानकादरम्यानं हा मेगा ब्लाॉक असणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दहा गाड्यांना लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात (Konkan railway mega block) आहे.

नवीन लूपलाईन टाकण्यासाठी आज मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. लुपलाईनसाठी निवसर ते विलवडे या स्थानकादरम्यान 8 तास वाहतूक बंद राहणार आहे. याचा परिणाम प्रामुख्याने रत्नागिरी ते राजापूरपासून पुढे गोव्याच्या दिशेला जाणाऱ्या 10 गाड्यांवर होणार असल्याचे बोललं जात आहे. तसेच या मेगाब्लॉकमुळे काही गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तात्काळ शक्य नाही. त्यामुळे विविध स्थानकांवर गाड्यांचे क्रॉसिंग एकाचवेळी करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावलं उचलतं आहे. आतापर्यंत रोहा ते ठोकूरपर्यंत 11 विविध रेल्वे स्थानकांवर लूपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आलं (Konkan railway mega block) आहे.

तर विलवडे ते निवसर या सुमारे 25 किमीच्या टप्प्यात रेल्वे क्रॉसिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे दोन्हींमधील आडवली स्थानकात मुख्य लाईन आणि एक लूपलाईन आहे. पण एखादे इंजिन त्या ठिकाणी आले तर मुख्य लाईनच वाहतुकीसाठी खुली राहते. या स्थानकाची वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने दुसरी नवीन लूपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचे अंतिम टप्प्यातील काम 27 डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी रात्री 11.45 पासून हा मार्ग बंद केला जाईल. हे काम सकाळी पावणेआठ वाजता संपेल. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील मंगलुरू एक्‍स्प्रेस, गांधीधाम – नागरकॉइल एक्‍स्प्रेस, कोचुवेली – डेहराडून एक्‍स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस, एर्नाकुलम – हजरत निजामुद्दिन मंगला एक्‍स्प्रेस, एलटीटी – मडगाव डबलडेकर, कोचुवेली – इंदूर एक्‍स्प्रेस, मडगाव – रत्नागिरी आणि रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर या दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.

नववर्षाच्या स्वागतासाठी शनिवारची सुट्टी धरून लाखो पर्यटक कोकणात येत आहेत. मात्र या मेगा ब्लॉकमुळे पर्यटकांचे हाल होणार आहे. मात्र मध्यरात्री पूर्णपणे वाहतूक बंद ठेवणार नसल्याचा दावा कोकण रेल्वे प्रशासनाने केला (Konkan railway mega block) आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.