नव्या शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकांचा गोंधळ

राज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्या शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात पालकांचा गोंधळ
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 4:04 PM

पुणे : राज्याचे नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या पुण्यातील पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचा कायदा असतानाही पुण्यातील एका शाळेने मुलांना नापास केल्याच्या मुद्द्यावर शेलार यांना बोलण्याची मागणी पालकांनी केली. मात्र, शेलार पालकांना वेळ न देताच कार्यक्रमातून निघून गेल्याने संतप्त पालकांनी गोंधळ घातfल्याचे सांगण्यात येत आहे.

पालकांनी सांगितले, “संबंधित शाळेने आमच्या 6 वी आणि 7 वीच्या मुलांना नापास केले. या शाळा मनमानी करत आहेत. आम्ही यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, मात्र शिक्षणमंत्र्यांनी वेळ देणेही टाळले.” यावेळी शेलार यांना अकरावी प्रवेशातील गोंधळाबाबतही विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी यावरही बोलणे टाळले.

याआधी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मध्यस्थी केली होती. मात्र, शाळेने विद्यार्थ्यांना पुन्हा काढून टाकले, असाही आरोप संबंधित पालकांनी केला आहे. आशिष शेलार पुण्यातील हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशनच्यावतीने ‘पढेगा भारत’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, राज्यसभा खासदार राकेश सिन्हा, खासदार अमर साबळे, अविनाश धर्माधिकारी, मेधा कुलकर्णी आदी मान्यवरही उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.