पनवेल मनपासोबत MGM हॉस्पिटलचा करार; 200 ICU बेडसह 300 RT-PCR टेस्टची सुविधा!

पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळालाय. सदर बेड 1 मे 2021 पासून टप्प्याटप्प्याने महापालिकेला प्राप्त होतील. MGM Hospital Panvel Municipal Corporation

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, पनवेल
  • Published On - 0:48 AM, 23 Apr 2021
पनवेल मनपासोबत MGM हॉस्पिटलचा करार; 200 ICU बेडसह 300 RT-PCR टेस्टची सुविधा!
CORONA HOSPITAL

पनवेल: पनवेल महापालिकेने एप्रिलच्या सभेत घेतलेल्या निर्णयानुसार आज एमजीएम रुग्णालय, कामोठे आणि पनवेल महापालिका यांच्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने 200 ICU बेड मिळण्यासाठी करार करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालय (MGM Hospital) कामोठे येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 250 बेड सुविधा उपलब्ध असून, नवीन करारामुळे आणखी 200 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळालाय. सदर बेड 1 मे 2021 पासून टप्प्याटप्प्याने महापालिकेला प्राप्त होतील. (MGM Hospital agreement with Panvel Municipal Corporation; Facilitate 300 RT-PCR tests with 200 ICU beds)

दररोज 300 टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरिता करार

पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज 500 आरटीपीसीआर चाचण्या जे जे रुग्णालयात, तर 200 चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. चाचण्या करण्याची सुविधा अपुरी पडू लागल्यामुळे कोरोना बाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची मोफत आरटीपीसीआर टेस्ट करण्याकरिता दररोज 300 टेस्ट एमजीएम रुग्णालयामार्फत मिळण्याकरितासुद्धा यावेळी करार करण्यात आला. त्याचप्रमाणे तेरणा मेडिकल कॉलेज यांच्याकडून सुद्धा दररोज 300 आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यामुळे पनवेल महापालिकेतील नागरिकांना अधिकच्या 600 आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत.

नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध होणार

सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करत असून, एमजीएम आणि तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी 300 आरटीपीसीआर टेस्ट मिळण्याकरिता करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दररोज 1300 आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून मिळतील.

महाराष्ट्र शासनाने 800 बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभारले

पनवेलमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने 800 बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभे करण्याकरिता मान्यता दिलीय. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या गोडाऊनमध्ये कळंबोली येथे 200 आयसीयू बेड आणि 600 ऑक्सिजन बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महापालिकेला एमजीएम कडील 200 आयसीयू बेड आणि जम्बो फॅसिलिटीतील 800 बेडस् असे एकूण 1000 बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय एमजीएम मध्ये 250 बेड महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना या अंतर्गत पनवेल करांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध राहतील.

संबंधित बातम्या :

Oxygen Express : देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

MGM Hospital agreement with Panvel Municipal Corporation; Facilitate 300 RT-PCR tests with 200 ICU beds