लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता नक्की कधी येणार? नेत्यांमध्येच एक वाक्यता नाही?; वाचा कोण काय म्हणालं?

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये देणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता नक्की कधी येणार? नेत्यांमध्येच एक वाक्यता नाही?; वाचा कोण काय म्हणालं?
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता नक्की कधी येणार? नेत्यांमध्येच एक वाक्यता नाही?
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 11:12 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता नेमका कधी येणार? याबाबत राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता नसल्याचं दिसत आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये देणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण योजनेचा पहिला हप्ता नेमका कोणत्या दिवशी होणार याबाबत मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचं बघायला मिळत आहे. याआधी राज्य सरकारकडून रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यातील महिलांना योजनेचा पहिला हप्ता देवून खूश केलं जाईल, असं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मंत्र्यांकडून याबाबत वेगवेगळा दावा केला जातोय.

राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत नांदेडच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. “लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 16 किंवा 17 ऑगस्टला मिळेल”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळीच तारीख सांगितली.

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

“लाडकी बहिण योजना खुप यशस्वी होईल. १९ तारखेला रक्षाबंधनांच्या दिवशी कमीत कमी २ कोटी महिलांच्या खात्यात ३-३ हजार प्रत्येकी जाणार”, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. एकीकडे आदिती तटकरे या 16 किंवा 17 तारखेला पहिल्या हप्पत्याचे पैसे येतील, असं सांगत आहेत. तर अब्दुल सत्तार हे 19 तारीख सांगत आहेत. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच याबाबत एक वाक्यता नसल्याचं दिसत आहे.

आदिती तटकरे यांचा विरोधकांना टोला

दरम्यान, आदिती तटकरे यांनी या योजनेवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला. “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत आहे . आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले. सन्मान निधी आपल्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंद आहे. आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून विरोधकांना हे खटकते. महिलांच्या चेहऱ्यावर त्यांना आनंद बघवत नाही म्हणून ते योजनेवर टीका करत आहेत”, असा टोला आदिती तटकरे यांनी लगावला.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.