Chhagan Bhujbal : राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी स्वयंम पाटीलचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन

स्वयंम पाटील या 14 वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून सन्मानीत केले.

Chhagan Bhujbal : राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी स्वयंम पाटीलचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन
राष्ट्रीय बालपुरस्कारार्थी स्वयंम पाटीलचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 1:23 AM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील(Swayam Patil) याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून स्वयंम पाटील यास गौरविण्यात आले आहे. ही बाब नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी स्वयंम पाटील व त्याच्या कुटुंबियांची भुजबळ फार्म येथील कार्यालयात भेट घेत अभिनंदन केले आहे. (Minister Chhagan Bhujbal congratulates Swayam Patil on National Children’s Award)

स्वयंम पाटीलसारखे खेळाडू म्हणजे नाशिकचा अभिमान : भुजबळ

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वयंम पाटील याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत स्वयंम पाटीलसारखे खेळाडू म्हणजे नाशिकचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार भुजबळांनी काढले. स्वयंम पाटील या 14 वर्षीय बालकाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून सन्मानीत केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी संजीवनी जाधव, क्रीडा अधिकारी महेश पाटील, प्रकाश पवार, अविनाश टिळे, संदीप ढाकणे, माजी आमदार जयवंत जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही बाल पुरस्कार विजेत्यांचे केले अभिनंदन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’ मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. (Minister Chhagan Bhujbal congratulates Swayam Patil on National Children’s Award)

इतर बातम्या

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

Nashik | महिला वैद्यकीय अधिकारी कारमध्ये जळून खाक; कोळसा झालेली सापडली हाडे, घातपात की अपघात?

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.