जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, हसन मुश्रीफांची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. (Hasan Mushrif Demand Public Works Department Road Works Inquire)

जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, हसन मुश्रीफांची मागणी
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 2:38 PM

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे गेल्या 5 वर्षातील सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Hasan Mushrif Demand Public Works Department Road Works Inquire)

“जलयुक्त शिवार योजनेप्रमाणेच गेल्या पाच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाच्या चौकशीची गरज आहे. गेल्या पाच वर्षात Hybrid Annuity Model अंतर्गत झालेले राज्यातील रस्ते खराब झाले आहेत. तसेच याचे ठेकेदार पसार झाले आहेत. त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे,” अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.

हेही वाचा : जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला

दरम्यान जलयुक्त शिवारावर कँगने ताशेरे ओढले होते. त्याची  एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने चौकशी केली होती. त्या चौकशी अहवालात ही योजना बरोबर राबवण्यात आली नाही असे नमूद करण्यात आलं आहे. या योजनेचा कोणताही फायदा झाला नाही. विदर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही अनिल देशमुखांनी स्पष्ट केले होते.

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.

फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. ही योजना फडणवीसांची सर्वात महत्त्वकांक्षी योजना असल्याचं बोललं गेलं. मात्र, आता या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘द युनिक फाऊंडेशन’च्या अहवालात केला होता. (Hasan Mushrif Demand Public Works Department Road Works Inquire)

संबंधित बातम्या : 

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.