Shankarrao Gadakh Corona | शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन

शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Minister  Shankarrao Gadakh tested Corona positive)

Shankarrao Gadakh Corona | शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन
Shankarrao Gadakh

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण होत आहे. नुकतंच राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट केली आहे. शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Minister  Shankarrao Gadakh tested Corona positive)

शंकरराव गडाख यांची फेसबुक पोस्ट 

माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगिकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वाना विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे,आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असेही त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट असताना देखील पालकमंत्री गायब असल्याने टीका होत होती. गडाख हे 26 जानेवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. तर दुसरीकडे भाजपचे पालकमंत्री गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर यावे, असे पत्रक काढले होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आलीय. अशास्थितीत राज्याची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजार 508 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात काल तब्बल 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597 झाली आहे. त्यातील 25 लाख 22 हजार 823 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 55 हजार 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. मुंबईत काल दिवसभरात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 12 महिलांचा समावेश आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे 82 टक्के आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचं प्रमाण 42 दिवसांवर आला आहे.

संबंधित बातम्या : 

Corona | मुंबईत कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्ण, तर 25 रुग्णांचा मृत्यू, संपूर्ण शहराची परिस्थिती काय?

Maharashtra Corona Update : चिंता वाढली; गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण, तर 222 जणांचा मृत्यू

Published On - 11:22 am, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI