मीरा रोडमधील बारमध्ये थरार, दोघांची हत्या, मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत फेकले

मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याची घटना समोर (Mira Road Double Murder) आली आहे.

मीरा रोडमधील बारमध्ये थरार, दोघांची हत्या, मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत फेकले

मीरा रोड : मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याची घटना समोर (Mira Road Double Murder) आली आहे. मीरारोड परिसरातील एका बारमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन या दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. दरम्यान ही हत्या कोणत्या कारणामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. नरेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बारचे कर्मचारी होते.

या बारच्या मालकाने गुरुवारी रात्री 10.30 वा. याबाबतची माहिती मीरारोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्या दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. तसेच या दोन्ही मृतदेहांच्या डोके आणि शरीरावर जखमा आढळल्या .

दरम्यान मीरा रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा शोध सध्या सुरु (Mira Road Double Murder) आहे.

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू

एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे गुन्हेगारांचा उच्छाद, नागपुरात 24 तासात 3 खून

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *