आधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक

गारगाई धरण बांधायचे असेल तर आधी बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करा त्यानंतरच धरणावर विचार होईल, असा पवित्रा शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतला. (MLA Daulat Daroda on Gargai dam project)

आधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक

ठाणे : गारगाई धरण बांधायचे असेल तर आधी बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करा त्यानंतरच धरणावर विचार होईल, असा पवित्रा शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतला. शासकीय अधिकारी आणि बाधित गावांच्या प्रतिनिधींची वाडा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत आमदार दरोडा यांनी धरणग्रस्त गावातील नागरिकांची भूमिका मांडली. तसेच गावाच्या प्रतिनिधींनीही शासकीय अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. (MLA Daulat Daroda on Gargai dam project)

मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात नवे गारगाई धरण बांधण्याचे नियोजन आहे. या नव्या धरणामुळे मुंबईची पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे गारगाई धरणाची झळ अनेक गावांना बसणार असून अनेकांचं विस्थापन होणार आहे. अनेकांच्या शेतजमीनी आणि घरं धरणात जाणार आहेत. त्यामुळे बाधित गावांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वाडा येथील शासकीय विश्रामगृहात बाधित गावांचे प्रतिनिधी आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी आमदार दौलत दरोडादेखील उपस्थित होते. विस्थापितांचे पुनर्वसनाच्या बाबतीत समाधान झाल्याशिवाय धरणाचे काम सुरु करु नये, अशी सूचना त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. बाधितांच्या मागण्या मान्य करुनच धऱणाच्या कामाला सुरुवात करवी अशी भूमिकाही त्यांनी घेतली.

या बैठकीला धरणग्रस्त गावांचे प्रतिनिधी, आमदार दौलत दरोडा तसेच उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

तिवरे धरणग्रस्तांची थट्टा, अधिकारी म्हणतात – वाहून गेलेल्या वस्तूंची बिलं आणा

तिवरे धरणफुटीमागील खरा ‘खेकडा’ कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती

(MLA Daulat Daroda on Gargai dam project)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *