नगरमधील के के रेंज प्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही, आमदार लंकेंची ग्वाही

लष्कराच्या के. के. रेंजप्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा केला आहे.

नगरमधील के के रेंज प्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही, आमदार लंकेंची ग्वाही
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 7:00 PM

अहमदनगर : लष्कराच्या के. के. रेंजप्रकरणी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा केला आहे. भाजप खासदार सुजय विखेंनी याप्रकरणी सत्य निवडणुकीपूर्वी बाहेर येईल असं वक्तव्य केले होते. त्यामुळे या प्रकरणी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आमदार लंके यांनी कोणत्याही जमिनीचे अधिग्रहण होणार नसल्याचं सांगितलं आहे. (MLA Nilesh Lanke On K K Range land Acquisition)

“के. के. रेंज प्रकरणी कोण राजकारण करतंय हे मला माहिती नाही. मात्र शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभा केला आणि त्यात आम्ही जिंकलो आहे”, असं म्हणत लंके यांनी खासदार सुजय विखेंना टोला लगावला.

“शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. त्या बैठकीला संरक्षण खात्याचे तिन्ही दलाच्या प्रमुखांसह अधिकारीदेखील उपस्थित होते. त्यावेळी या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याचं लंके यांनी सांगितलं. तसेच त्या जमिनीचे मुल्यांकन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र तो निर्णय त्यांनी मागे तर घेतलाच शिवाय शेतकऱ्यांचं क्षेत्र न जाण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं, असं लंके यांनी स्पष्ट केलं. तसेच यासंदर्भात अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे, असंही लंके म्हणाले.

“सरकार कोणाचं आहे, त्यापेक्षा ते लोकहिताचे सरकार आहे. निवडून येण्यापर्यंत व्यक्ती एका पक्षाचा असतो मात्र निवडून आल्यानंतर तो सर्वांचा असतो. त्यामुळे केंद्र सरकार हे पूर्ण देशाचं सरकार असून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याचं” लंके यांनी म्हटलंय.

लष्कराच्या के के रेंज विस्तारीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, आता यावरुन नगर जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे, असं वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केलं. त्यामुळे के के रेंज विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण होणार की नाही? असा प्रश्न स्थानिकांना पडलाय. तसंच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

(MLA Nilesh Lanke On K K Range land Acquisition)

संबिधित बातम्या

नगरमध्ये के के रेंज विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, सुजय विखेंचा राज्य सरकारवर निशाणा

पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.