छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किट खरेदी करा, रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

केंद्र सरकारने चीनसह अन्य देशांमधून आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किट परत पाठण्याचा (Rohit Pawar on Chinese test kits) निर्णय घेतला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:43 PM, 25 Apr 2020
छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किट खरेदी करा, रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

मुंबई : केंद्र सरकारने चीनसह अन्य देशांमधून आलेल्या खराब अँटीबॉडी टेस्ट किट परत पाठण्याचा (Rohit Pawar on Chinese test kits) निर्णय घेतला आहे. या किट अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या परत पाठवल्या जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे.

“या टेस्टिंग किटसाठी पेमेंट केले नसले तरी खरेदी, वितरण, त्यातील दोष (Rohit Pawar on Chinese test kits) कळण्यात आणि आता ते परत करण्यात मौल्यवान वेळ गेला. चाचण्यांना झालेल्या दिरंगाईने देशाने आधीच जबर किंमत चुकवली आहे. त्यामुळे अधिक विलंब न लावता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किटची खरेदी करता येईल का, याचा विचार करावा,” असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूंच्या चाचणींसाठी भारताने चीनकडून 5 लाख अँटीबॉडी टेस्टिंग किट मागवल्या होत्या. या किट भारताने विविध राज्यांना दिली. मात्र या टेस्ट किट खराब असल्याची तक्रार राज्यांनी केली. यानंतर केंद्र सरकारने त्या परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये या टेस्टिंग किटची चाचणी घेण्यात आली. मात्र या चाचण्या अयशस्वी ठरत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार राज्याने यावर बंदी लावली आहे.

इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राज्याने या टेस्टिंग किटची अचूकता (accuracy) नसल्याची तक्रार केली होती. तसेच इतर राज्यांना याबाबत विचारले असता, काही ठिकाणी या किटची अचूकता 6 टक्के तर काही ठिकाण 71 टक्के होती. त्यामुळे अशा फरकांवर दुर्लक्ष करता येणार नाही, असे ICMR च्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

आयसीएमआरच्या या रिपोर्टनंतर केंद्र सरकारने चीनची रॅपिड टेस्ट किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारी या सर्व किट चीनला परत पाठवण्यात येणार (Rohit Pawar on Chinese test kits) आहेत.

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे