शिवेंद्रराजेंवर मुंबईत उपचार, साताऱ्यावरुन मुंबईला हलवलं!

शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale hospitalized) त्यांच्या 'सुरुची' बंगल्यावर होते. रात्री उशिरा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.

Shivendra Raje Bhosale hospitalized, शिवेंद्रराजेंवर मुंबईत उपचार, साताऱ्यावरुन मुंबईला हलवलं!

सातारा : भाजपचे सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale hospitalized) यांना प्रकृती अस्वास्थामुळे उपचारासाठी मुंबईला हलवलं आहे. मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhosale hospitalized) त्यांच्या ‘सुरुची’ बंगल्यावर होते. रात्री उशिरा अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने साताऱ्यातील ‘प्रतिभा’ रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

शिवेंद्रराजे  काल रात्री एका कार्यक्रमासाठी फलटणमध्ये गेले होते. तिथे जेवण झाल्यानंतर ते रात्री साताऱ्यातील ‘सुरुची’ बंगल्यावर पोहोचले. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचारानंतर, शिवेंद्रराजेंना बरं वाटू लागलं. मात्र सकाळी ते पुन्हा उपचारासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिवेंद्रराजेंवर उपचार होणार आहेत.

शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीतून भाजपात

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवेंद्रराजेंनी भाजपचा झेंडा हाती धरला होता. 30 जुलै 2019 रोजी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या शिेवेंद्रराजेंनी पुन्हा आमदारकी मिळवली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलतबंधू असलेल्या शिवेंद्रराजे यांच्यात काही वर्षांपासून असलेला वाद सर्वश्रुत आहे. दोन्ही राजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपची वाट धरली. त्यानंतर दोघांचं मनोमीलन झाल्याचंही म्हटलं जातं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *