अ‍ॅप बंद स्वागतार्ह, आता चीनसोबत आर्थिक व्यवहार नको : मनसे

"सर्व चिनी अ‍ॅप बंद केलेत हे स्वागतार्ह आहे. पण चिनसोबत आर्थिक व्यवहार तरी कशाला", असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केला (MNS against Chinese vessels in JNPT) आहे.

अ‍ॅप बंद स्वागतार्ह, आता चीनसोबत आर्थिक व्यवहार नको : मनसे
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 1:31 PM

रायगड : “सर्व चिनी अ‍ॅप बंद केलेत हे स्वागतार्ह आहे. पण चिनसोबत आर्थिक व्यवहार तरी कशाला”, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी केला (MNS against Chinese vessels in JNPT) आहे. भारत-चीनच्या दरम्यान गलवाण खोऱ्यात सीमा वादावरुन तणावाची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली. पण असे असूनही जेएनपीटीमध्ये बेधडक लागत असलेल्या चिनी व्हेसल्सवर मनसेने सवाल उपस्थित केला (MNS against Chinese vessels in JNPT) आहे.

संदेश ठाकूर म्हणाले, “सर्व चिनी अ‍ॅप बंद केलेत हे स्वागतार्ह आहे. पण चीनसोबत आर्थिक व्यवहार तरी कशाला, त्यांच्याशी व्यापार उद्योग हवाच कशाला”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“चायनावरून भारतात येणारी व्यापारी जहाजे (कंटेनर व्हेसल्स) कधी बंद करणार. हे थांबले नाही तर मनसैनिक रस्त्यावर उतरून याचा जाब विचारेल आणि त्याची सर्व जबाबदारी जेएनपीटी प्रशासनावर राहील”, असा इशाराही त्यांनी जेएनपीटी प्रशासनाला दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावरही सडकून टीका केली आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने अनेक चिनी कंपन्यांसोबतचे कंत्राटांचे करारही रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या चीनशी काही संबंधच ठेवायचा नाही. त्यांच्यासोबत व्यापार उद्योग तरी हवा कशाला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेने यापूर्वीच जेएनपीटी प्रशासनाला दिलेल्या पत्राचा आधार घेत विचारला आहे. या बंदरासह भारतातल्या विशेषतः महाराष्ट्रातील कोणत्याही बंदरात चिनी जहाजे कशी काय लावली जातात त्यांच्याशी व्यापार उद्योग हवाच कशाला अशा प्रकारचा प्रश्नही संदेश ठाकूर यांनी विचारला आहे.

“संपूर्ण जगाला कोरोनाच्या खाईत लोटणारा देश म्हणून चीनवर सध्या जगभरातून टीका होत आहे. त्यातच भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी गलवाण खोऱ्यामध्ये केलेल्या हरकतींमुळे भारतीयांमध्ये चीनबद्दल संताप आहे. चिनी सैनिकांनी कपटाने आपल्या सैनिकांना मारल्याचा ही संताप नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे जोरदार स्वागत भारतीय नागरिकांनी केले आहे”, असंही ठाकूर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

चीनला आणखी एक झटका, भारतापाठोपाठ अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत

भारतीय उद्योगपतीचा झटका, चीनला तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटका

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.