Raj Thackrey : राज ठाकरे यांनी भाजपच्या फेक नरेटीव्हच्या दाव्यातील हवाच काढली, म्हणाले, सर्वात आधी…

लोकसभेला विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केलं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्याच फेक नरेटिव्हचा आम्हाला निवडणुकीत फटका बसला असा आरोप भाजपकडून सतत करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते फेक नरेटिव्ह सेट करतात असा आरोपही भाजप आणि महायुतीने केला होता. त्यामुळे आम्ही निवडणूक हरलो, असा दावा त्यांनी केला

Raj Thackrey : राज ठाकरे यांनी भाजपच्या फेक नरेटीव्हच्या दाव्यातील हवाच काढली, म्हणाले, सर्वात आधी...
राज ठाकरे यांनी भाजपच्या फेक नरेटीव्हच्या दाव्यातील हवाच काढली
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 10:56 AM

लोकसभेला विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केलं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. त्याच फेक नरेटिव्हचा आम्हाला निवडणुकीत फटका बसला असा आरोप भाजपकडून सतत करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे नेते फेक नरेटिव्ह सेट करतात असा आरोपही भाजप आणि महायुतीने केला होता. त्यामुळे आम्ही निवडणूक हरलो, असा दावा त्यांनी केला. मात्र त्यांच्या याच विधानाच समाचार घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडेतोड उत्तर देत भाजपच्या दाव्यामधील हवाच काढून टाकली. ‘सर्वात पहिले हे कोण बोललं ? पहिल्यांदा भाजपचा अयोध्येचा उमेदवारंच हे बोलला. 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार हे त्यांच्याच उमेदवाराचं विधान होतं ‘ असं सांगत राज ठाकरे यांनी भाजपवरच हल्लाबोल चढवला. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

त्यांनीच विरोधकांना नरेटिव्ह दिलं ना..

‘सर्वात आधी याबाबत कोण बोललं, पहिल्यांदा त्यांचा (भाजप) अयोध्येचा उमेदवार बोलला. ० 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार हे विधान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने केलं होतं. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिलं ना, तोपर्यंत या गोष्टींची कुठेही चर्चापण नव्हती. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोकं बोलले परत याविषयी.. तिथूनचं हे सगळं सुरू झालं , ‘ असं म्हणत राज ठाकरे यांनी फेक नरेटिव्हच्या मुद्यामधली हवाच काढून टाकली.

मोदींना लोकसभेपुरताच पाठिंबा

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. निवडणुकीदरम्यान ते  अनेक प्रचारसभेतही दिसले. आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असून त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी महायुती सरकारला पाठिंबा देण्याबद्दल मोठे विधान केले.

‘ मी त्यावेळी सांगितलं होतं की, ही युती लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. मी त्यावेळी विधानसभेबद्दल काहीही बोललो नाही’, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

भाजपचा विरोधकांवर आरोप काय ?

‘ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश आलं नाही. किंबहुना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा महाराष्ट्रात मिळाल्या. राज्यात आमची लढाई जशी मविआच्या तीन पक्षांशी होती. काही प्रमाणात नरेटिव्हच्या विरोधात लढावं लागेल. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. तो नरेटिव्ह ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही’, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. संविधान, घटना बदलण्याचे जे नरेटिव्ह तयार करण्यात आलं. त्यामुळे मोठा फटका बसल्याचे मत मांडले. त्यानंतर अनेक वेळा भाजपकडून या फेक नरेटिव्हचा उल्लेख करत विरोधकांवर टीकास्त्र डागण्यात आलं होतं.

मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन पोलखोल करत भाजपच्या दाव्यामधील हवाच काढून घेतली आहे. त्यावर आता भाजपकडून काय उत्तर देण्यात येतं याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.