राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा, मनसेची मागणी

संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (Raju patil demand curfew on state) केली आहे.

राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा, मनसेची मागणी
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 4:45 PM

मुंबई : “संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जाहीर करावा”, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी (Raju patil demand curfew on state) केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. आज (20 मार्च) रात्री 12 वाजल्यापासून राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील अत्यवाश्यक सेवा सोडून सर्व खासगी ऑफिस आणि दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सराकरने (Raju patil demand curfew on state) घेतला आहे.

“महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल आणि जर जनतेला केलेले ‘स्वयंशिस्ती’ चे आवाहन काम करणार नसेल, तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा”, अशी मागणी ट्वीट करत आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे या शहरातील गर्दी रोखण्यासाठी सरकारकडून शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. पण तरी सुद्धा गर्दी कमी होत नसल्यामुळे राज्य सरकारने आता  चार शहरातील 31 मार्च पर्यंत सर्व ऑफिस बंद करण्याची घोषणा केली आहे.

पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारमध्ये जर गर्दीमध्ये घट झालेली दिसली नाही तर भविष्यात आणखी कठोर निर्णय घेतले जातील, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

सरकारी कार्यालयात कर्माचारी 25 टक्के कर्मचारी

सरकारी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यावरुन 25 टक्क्यावर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना जे शक्य नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.