राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला अनुपस्थित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. MNS president Raj Thackeray admitted to Lilavati hospital

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 17:56 PM, 10 Apr 2021
राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला अनुपस्थित

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावलीय. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावतीत दाखल करण्यात आल्यानं ते या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत.

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता

राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही.शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल. परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या दुखण्याच्या त्रासाची माहिती जाणून घेत विचारपूस केली होती. तसंच लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचेही सुचवले होते.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत.  पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत दिलाय.

रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना करायला हवी: देवेंद्र फडणवीस

रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना करायला हवी. खासगी स्तरावर रेमडेसिवर कुठेही नाही ही गंभीर बाब आहे. रेमडेसिवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल, इतर ठिकाणांहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावं लागेल, बेड्स मॅनेज करावे लागतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही, त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. निर्बंध काही प्रमाणात असले पाहिजे. जनतेचा उद्रेक ही लक्षात घेतला पाहिजे. काही तर मार्ग काढावा लागेल, असंही फडणवीसांनी अधोरेखित केलंय.

हेही वाचा :

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू शकू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

MNS president Raj Thackeray admitted to Lilavati hospital not attended all party meet called by maharashtra cm uddhav thackeray on lockdown