पुढच्या चार दिवसात कोणकोणत्या विभागात पावसाचा अंदाज?

Monsoon in Marathwada, पुढच्या चार दिवसात कोणकोणत्या विभागात पावसाचा अंदाज?

पुणे : उशिरा दाखल झालेला मान्सून अखेर राज्यात सर्वदूर पसरलाय. राज्यात अनेक ठिकाणी मान्सून बरसतोय. मात्र सोमवारपासून तो अजूनही सक्रिय होणार आहे. राज्यात सात ते आठ टक्के ठिकाणी मान्सून बरसला नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून दाखल झालाय, तर मुंबई, उर्वरीत कोकण, मध्य महाराष्ट्रात 48 तासात मान्सून बरसणार आहे. पुण्यात आजपासून महिन्याच्या शेवटपर्यंत कमी-अधिक पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोकण गोव्यामध्ये 24 ते 28 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सोमवार आणि मंगळवारी पाऊस पडेल काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यात सोमवारपासून दोन दिवस अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे.  विदर्भातही सोमवारी पाऊस पडणार असून  28 तारखेनंतर 2 जुलैपर्यंत सतत कमी-जास्त पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुणेकरांनाही पाऊस ओलाचिंब करणार आहे. पुण्यात सोमवारी आणि मंगळवारी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस राहिल, तर पुण्यात  24 ते 26 तारखेदरम्यान कमी पाऊस असेल. 27 ते 28 तारखेला हलका पाऊस आणि  29 ते 30 तारखेला आकाश ढगाळ राहून कमी पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अजून चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पडेल. मात्र त्यानंतर तो विरळ होईल. कोकण आणि गोव्यामध्ये मात्र सतत चांगला पाऊस पडेल. तर हवामन विभागाने जुलै महिन्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगाल आणि अरबी समुद्रातील परिस्थिती मान्सूनसाठी पोषक आहे. त्यामुळे जुलै महिन्यातही पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *