नवीन वर्षात साईंच्या चरणी 15 कोटींचं दान, तब्बल 19 देशांमधून देणगी

शिर्डी : कोणतीही सुट्टी असो, भाविक देशभरातले भाविक शिर्डीकडे वळतात. शिवाय साई बाबांच्या चरणी भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने दान केलं जातं. यावर्षी नाताळाच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांनी साईंच्या चरणी भरभरुन दान केलंय. एकूण 14 कोटी 54 लाखांचं दान करण्यात आल्याची माहिती साई संस्थानने दिली. साई संस्थानकडून 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान दिलेल्या दानाची …

नवीन वर्षात साईंच्या चरणी 15 कोटींचं दान, तब्बल 19 देशांमधून देणगी

शिर्डी : कोणतीही सुट्टी असो, भाविक देशभरातले भाविक शिर्डीकडे वळतात. शिवाय साई बाबांच्या चरणी भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने दान केलं जातं. यावर्षी नाताळाच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांनी साईंच्या चरणी भरभरुन दान केलंय. एकूण 14 कोटी 54 लाखांचं दान करण्यात आल्याची माहिती साई संस्थानने दिली.

साई संस्थानकडून 22 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान दिलेल्या दानाची मोजदाद करण्यात आली आहे. दानपेटीत साडे आठ कोटी मिळाले असून भाविकांनी साडेसोळा किलो चांदी आणि 507 ग्रॅम सोने अर्पण केले आहे. याशिवाय ऑनलाईन माध्यमातून 3 कोटी देणगी प्राप्त झाली आहे.

दानपेटीत 19 देशांचं 64 लाखांचं परकीय चलनही मिळालं आहे. यंदा गतवर्षीपेक्षा भाविकांची संख्या कमी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 लाखांनी दान कमी आल्याचीही माहिती साई संस्थानकडून देण्यात आली. नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भाविक साईंच्या चरणी भरभरुन दान देत असतात. ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या शताब्दी समाधीच्या उत्सवात भाविकांनी चार दिवसात 5 कोटी 97 लाखांचं दान केलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सव्वा लाख रुपयांनी जास्त होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *