सासूच्या निधनानंतर सूनेचाही अखेरचा श्वास, नातीच्या लग्नाआधी काळाचा घाला

वर्धा जिल्ह्यातील कोरा गावात सासू-सूनेने काही तासांच्या कालावधीत अखेरचा श्वास घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

Two Death in a family, सासूच्या निधनानंतर सूनेचाही अखेरचा श्वास, नातीच्या लग्नाआधी काळाचा घाला

वर्धा : वर्ध्यातील नखाते कुटुंबासोबत नियतीने अजब खेळ खेळला. सासूबाईंच्या निधनानंतर सूनेनेही जगाचा निरोप घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेमतेम महिन्याभरातच नखातेंच्या नातीचा शुभविवाह नियोजित आहे. त्यामुळे कुटुंबातील आनंदाच्या वातावरणावर दुःखाची गडद सावली (Two Death in a family) पडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावात सासू-सूनेने काही तासांच्या कालावधीत अखेरचा श्वास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. कोरा येथील पार्वतीबाई महादेव नखाते यांचं काल रात्री (बुधवार 25 डिसेंबर) रात्री 11 वाजता निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडल्याने सूनेने सासूचा काटा काढला

सासूबाईंच्या निधनाची माहिती नातेवाईकांना देण्यात आली, त्यानुसार सर्वजण जमाही झाले. मात्र अंत्ययात्रेसाठी आलेल्या नातलगांना सूनबाईचीही अंत्ययात्रा करुन परतण्याची वेळ आली.

पार्वतीबाईंच्या अंतिम संस्कार विधीची तयारी सुरु असतानाच, त्यांची सून दुर्गा हरिदास नखाते यांचीही प्राणज्योत आज (गुरुवार 26 डिसेंबर) सकाळी मालवली. दुर्गा यासुद्धा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

सासू पार्वताबाई आणि सून दुर्गा या दोघींची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्याची दुर्दैवी वेळ नखाते कुटुंबावर आली. एकाच वेळी सासू-सूनेला चिताग्नी देण्यात आला. नखाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

विशेष म्हणजे दुर्गा यांच्या कन्येचा विवाह समारंभ येत्या 19 जानेवारीला नियोजित आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना शोककळा पसरली. सासू-सूनेने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याच्या घटनेमुळे (Two Death in a family) गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *