बारामती-फलटणमध्ये दबंग-३ चं चित्रीकरण, सलमान खानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

बारामती आणि फलटण तालुक्यात सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे.

बारामती-फलटणमध्ये दबंग-३ चं चित्रीकरण, सलमान खानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
Follow us
| Updated on: Jul 18, 2019 | 11:10 AM

पुणे : बारामती आणि फलटण तालुक्यात सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी तेथे चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पहायला मिळली. मात्र, चाहत्यांना चित्रीकरणाच्या स्थळावर प्रवेशास मज्जाव करण्यात आला.

एरवी हिंदी चित्रपटांचं शुटींग म्हटलं, की सातारा, वाई अशा भागांनाच प्राधान्य दिलं जायचं. मात्र मागील काही दिवसांमध्ये बारामतीतही चित्रपटांचं शुटींग होवू लागलंय. दबंग 3 च्या निमित्तानं सलमान खान याच्यासह अरबाझ खान, सोनाक्षी सिन्हा, महेश मांजरेकर, दिग्दर्शक प्रभु देवा अशा दिग्गज कलाकारांनी चित्रीकरणासाठी हजेरी लावली आहे. 22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.

बारामती तालुक्यातील होळ आणि भिकोबानगर येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. यानिमित्ताने पहिल्यांदाच तालुक्यात बड्या अभिनेत्याच्या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील राहुल जगताप या युवकाची ओपन जीपही या चित्रपटात वापरण्यात आली. त्याचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल जगताप यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी आपली ओपन जीप दिली आहे.

या चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात आलीय. त्यामुळं चित्रीकरण स्थळी कुणालाही प्रवेश ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे चित्रपटाची दृश्ये चित्रित होत असताना कोणत्याही प्रकारचं (फोटो किंवा व्हिडीओ) करण्यास मज्जाव केला जातो आहे.

सलमान खानसह अनेक दिग्गज कलावंत चित्रीकरणाच्या निमित्तानं बारामती-फलटण परिसरात आहेत. मात्र सुरक्षा व्यवस्था आणि चित्रपटाबद्दल गोपनीयता यामुळं त्यांच्या चाहत्यांना केवळ त्याची झलक पहायला मिळते आहे. त्यामुळे फोटो किंवा सेल्फी मिळत नसल्यानं चाहत्यांचा हिरमोड होताना दिसतोय. असं असलं तरी बारामतीत प्रथमच होत असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाची चांगलीच चर्चा होवू लागली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.