सरकार सकारात्मक तर आम्हीही नकारात्मक राहणार नाही; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मराठा समाजाची भूमिका

भाजप खासदार संभाजीराजे यांची आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली (MP Sambhajiraje meeting with Maratha leaders).

सरकार सकारात्मक तर आम्हीही नकारात्मक राहणार नाही; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मराठा समाजाची भूमिका
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 10:14 PM

मुंबई : भाजप खासदार संभाजीराजे यांनी आज चार ते पाच मराठा समन्वयकांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री, मराठा समन्वयक आणि संभाजीराजे यांच्यात जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मराठा समाजातील नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. सरकार सकारात्मक असल्यानंतर आम्ही नकारात्मक विचार करणं चुकीचे आहे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली.

“आज मुख्यमंत्र्यांसमवेत उपसमिती सोबत बैठक झाली. प्रमुख मागण्या बऱ्याच होत्या मात्र सुपर न्यूमरी पद्धत बाबत मागणी प्रमुख होती. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री या विषयावर सकारात्मक आहेत. एसएबीसी ला कुठेही धोका पोहचू नये यासाठी कायदेशीरबाबी तपासल्या जाणार आहेत. उद्याच कायदेतज्ज्ञसोबत उपसमिती चर्चा करेल. ती चर्चा सकारात्मक होईल आणि लवकर निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे. सरकार सकारात्मक असल्यानंतर आम्ही नकारात्मक विचार करणं चुकीचे आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

आजच्या बैठकीत दोन प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. यापैकी पहिली मागणी ही सुपरन्युमरी पद्धतीने नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला जास्तीत जास्त जागा कशा देता येतील, अशी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी सकारात्मक दिसून आले. मात्र, त्यांनी एवढेच सांगितले की, सामाजिक आणि आर्थिक प्रवर्गातंर्गत (एसईबीसी) देण्यात आलेला आरक्षणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सरकार काळजी घेत आहे. आम्ही सध्या याचा अभ्यास करत आहोत. मात्र, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीआधी भाजप खासदार संभाजीराजे यांची आज मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. गिरगाव येथील शारदा मंदिर स्कूल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर  संभाजीराजे चार ते पाच समन्वयकांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले (MP Sambhajiraje meeting with Maratha leaders).

शैक्षणिक प्रवेशासाठी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुपर न्यूमररी सीट्स पद्धतीचा वापर करण्याची सर्व समन्वयकांची मागणी आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, राजन घाग, विनोद साबळे उपस्थित आहेत.

आंदोलनासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून येत्या 8 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची गेल्या आठवड्यात 29 नोव्हेंबर रोजी निर्णायक बैठक पार पडली होती. या बैठकीत 8 डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.