पाऊस LIVE : मध्य रेल्वेवर तुफान गर्दी

मुंबईसह राज्यात गेले दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र आज पावसाचा जोर ओसरला असला, तरी राज्यात पावसाची संततधार अद्याप सुरुच आहे.

पाऊस LIVE : मध्य रेल्वेवर तुफान गर्दी

मुंबई : राज्यासह मुंबईत जोरदार बरसणाऱ्या पावसाने आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली आहे.  मुंबईत गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होते. या पावसाचा फटका मुंबईच्या वाहतुकीवरही पडला होता. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात काल (2 जुलै) सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. पावसाचा जोर आज ओसरलेला दिसत आहे. आज सकाळपासून मुंबईकर चाकरमणी घरातून ऑफिसला जाण्यासाठी निघाला आहे.  मध्य रेल्वेने रविवारच्या मेगाब्लॉकप्रमाणे लोकलचं वेळापत्रक तयार केल्याने, आजही प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

 LIVE UPDATE

Picture

मध्य रेल्वेकडून रविवारचं वेळापत्रक रद्द

अखेर मध्ये रेल्वेकडून रविवारचं वेळापत्रक रद्द, आता सर्व लोकल नियमित वेळेनुसार धावणार, प्रवाशांचे हाल झाल्यानंतर रेल्वेला जाग

03/07/2019,12:19PM
Picture

गर्दीमुळे रेल्वेतून तीन प्रवासी पडले

03/07/2019,12:15PM
Picture

कांदिवलीतील गटारत गाय पडली

03/07/2019,11:32AM
Picture

घाटकोपर स्टेशनवर महिला बेशुद्ध

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर गर्दीमुळे महिला बेशुद्ध, राजावाडी रुग्णालयात दाखल

03/07/2019,11:08AM
Picture

मध्य रेल्वेवर प्रत्येक स्टेशनवर गर्दी

मुंबईतील मध्य रेल्वेवर प्रत्येक स्टेशनवर गर्दी होत आहे.

03/07/2019,11:07AM
Picture

मालेगावात दोन भावंडे नाल्यातून वाहून गेले

मालेगाव तालुक्यातील वाघी येथील शाळेतून घरी येत असताना नाल्याच्या पुरात दोन बहीण भाऊ वाहून गेले. काल ही घटना घडली. त्यांचा शोध अजूनही सुरुच आहे. कु.पुजा बाळू पवार वय 14 आणि पारस बाळू पवार वय 8 अशी या भावंडांची नावं आहेत. काल रात्रीपासून या दोघांचा शोध सुरूच आहे. आज सकाळीच सहा वाजल्यापासून संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाच्या टीमने पुन्हा शोधकार्य सुरु केले. मात्र नाल्याच्या बाजूलाच एक नदी असल्याने तसेच जागोजागी जेसीबीने केलेले खड्डे आणि मोठया प्रमाणात झाडे झुडपे असल्याने शोध मोहिमेला अडथळे निर्माण होत आहेत.

03/07/2019,10:31AM
Picture

विक्रोळी स्टेशनवर गर्दी

03/07/2019,10:30AM
Picture

मध्य रेल्वे रविवारच्या वेळेनुसार धावत असल्याने दिवा स्टेशनवर प्रचंड प्रमाणात गर्दी

03/07/2019,9:27AM
Picture

वसईत पावसाची विश्रांती

वसई : वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती, मुख्य रस्त्यावरील सकल भागातले पाणी ओसरले

03/07/2019,9:25AM
Picture

मालाड दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

मालाड दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, बचावकार्यात तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश

03/07/2019,8:26AM
Picture

मध्य रेल्वे आज रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार

03/07/2019,8:19AM
Picture

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं, दोन जणांचा मृत्यू, 22 हून अधिक बेपत्ता

03/07/2019,8:14AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *