‘ऑनलाईन’ अभिवादन आवाहनाला भीम अनुयायांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद : किशोरी पेडणेकर

भीम अनुयायांनी ‘ऑनलाईन’ अभिवादनाला दिलेला  प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर म्हणाल्या.

‘ऑनलाईन’ अभिवादन आवाहनाला भीम अनुयायांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद : किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 11:46 PM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. मात्र, यंदा खबरदारीची योजना म्हणून कोव्हिड विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात आले. या आवाहनाला भीम अनुयायांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे दिसून येत असून चैत्यभूमीवर नागरिक नसल्याचं पाहायला मिळतंय. भीम अनुयायांनी ‘ऑनलाईन’ अभिवादनाला दिलेला  प्रतिसाद कौतुकास्पद आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar on Dr babasaheb Ambedkar mahaparinirwan Din)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन रविवारी (6 डिसेंबर 2020) रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिन तयारी बाबतची माहिती देणारी पुस्तिका महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या  माहिती पुस्तिकेचे प्रकाशन  किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडलं.

पेडणेकर म्हणाल्या, “आंबेडकरांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधाही पुरवल्या जातात. यंदा मात्र स्थिती वेगळी आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आणि आपण सर्व सहकार्याने प्रयत्न करत आहोत. कोरोनामुळे एकत्र येण्यावर असलेल्या मर्यादा पाहता अनुयायांनी यंदा चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने सातत्याने केले आहे. त्यास अनुयायांनी संपूर्ण प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या

दरवर्षी ५ डिसेंबरला देखील अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी रिघ असते. यंदा ती रिघ, अनुयायी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य रविवारी ६ डिसेंबर रोजी देखील अपेक्षित आहे, असे आवाहनही महापौरांनी याप्रसंगी पुन्हा एकदा केले. तसेच महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयांयाचे विशेष आभारही महापौरांनी मानले आहेत.

(Mumbai Mayor Kishori Pednekar on Dr babasaheb Ambedkar mahaparinirwan Din)

संबंधित बातम्या

महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे येऊ नये, ग्लोबल पॅगोडा आणि महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण करु, पण अनुयायांना चैत्यभूमीवर प्रवेश नाही : धनंजय मुंडे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.