सफाई कामगारांसाठी धनंजय मुंडे सरसावले, स्वतंत्र कक्ष निर्माण करुन प्रश्न निकाली काढण्याचे आदेश

केंद्राकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार 32 पैकी फक्त 11 जणांना याचा लाभ मिळाला आहे. तरी उर्वरीत 21 प्रकरणे ज्या पातळीवर प्रलंबित आहेत, त्याबाबत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मुंडे यांनी दिले आहेत.

सफाई कामगारांसाठी धनंजय मुंडे सरसावले, स्वतंत्र कक्ष निर्माण करुन प्रश्न निकाली काढण्याचे आदेश
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : मुंबईसारखी मायानगरी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाईक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतलाय. सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार 32 मृत सफाई कर्मचाऱ्यांपैकी फक्त 11 जणांनाच लाभ मिळाला आहे. उर्वरीत 21 प्रकरणे ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत, त्यावर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. (Dhananjay Munde orders to set up a separate cell to solve the problems of sanitation workers)

हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियाना नुकसान भरपाई मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, नगरविकास, कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषद सदस्य भाई गिरकर यांनी या विषयासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यामध्ये हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासंदर्भात केंद्र शासनाने केलेल्या कायद्याप्रमाणे राज्यात कार्यवाही करावी, असं सुचित केलं होतं.

हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या कुटूंबाला आधार

केंद्र शासनाने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 असून हा कायदा 6 डिसेंबर 2013 पासून देशात लागू आहे. या कायद्यातंर्गत दूषीत गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्राकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार 32 पैकी फक्त 11 जणांना याचा लाभ मिळाला आहे. तरी उर्वरीत 21 प्रकरणे ज्या पातळीवर प्रलंबित आहेत, त्याबाबत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मुंडे यांनी दिले आहेत.

लाड पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी करण्याचे निर्देश

सफाई कामगारांच्या घरांचा 21 वर्षाचा अनुशेष भरून काढणे, सफाई कामगारांचे वारसा हक्क कायदे, सफाई कामांमधील ठेकेदारी पध्दती रद्द करणे, याबाबत नगरविकास विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती 8 दिवसात सामाजिक न्याय विभागाला सादर करावी, असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याशी संबधित सर्व कामगारांना सफाई कामगार हे पदनाम देवून लाड पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी करावी असे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे यांच्या एका निर्णयाने विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी मिळणार मोठी मदत!

सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय, अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

Dhananjay Munde orders to set up a separate cell to solve the problems of sanitation workers

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI