महाराष्ट्र महामंथन : राज ठाकरेंच्या मुलाखतीतील 20 मुद्दे

‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल, यासह विविध राजकीय विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मुद्दा क्रमांक – 1 माझा जो परप्रांतियांचा मुद्दा आहे, तो जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आहे – राज ठाकरे मुद्दा क्रमांक – 2 परप्रांतिय लोक इथेही मतदान करतात आणि तिकडे जाऊनही मतदान करतात – राज […]

महाराष्ट्र महामंथन : राज ठाकरेंच्या मुलाखतीतील 20 मुद्दे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल, यासह विविध राजकीय विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुद्दा क्रमांक – 1

माझा जो परप्रांतियांचा मुद्दा आहे, तो जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आहे – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 2

परप्रांतिय लोक इथेही मतदान करतात आणि तिकडे जाऊनही मतदान करतात – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 3

इथल्या हॉस्पिटलमध्ये बाहेरचे लोक उपचार घेणार असतील, तर इथल्या लोकांचं काय? – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 4

परप्रांतियांमुळे इथले लोक सोईसुविधांपासून वंचित राहतात – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 5

निवेदनातून प्रश्न सुटत नाहीत, मग कोणता मार्ग पत्कारायचा, हे तुम्हीच सांगा – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 6

भाजपचे लोक राहुल गांधींना आतापर्यंत पप्पू-पप्पू करत होते, आता त्याच पप्पूचा परमपूज्य झालाय – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 7

नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा पराभव गुजरात विधानसभा निवडणुकीत झालाय – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 8

नोटाबंदी आणि जीएसटी या गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत, त्याचा परिणाम पाच राज्यात दिसला – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 9

राफेलवरुन कोर्टाने मोदी सरकारला क्लीन चिट दिलेली नाही – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 10

ज्याच्या कंपनीला विमान बनवण्याचा एक तासाचा अनुभव नाही, त्याला कंत्राट का? – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 11

साडेचार वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. असे का? लोकांना सामोरं जात नाहीत, म्हणजे काळेबेरे आहे – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 12

कन्हैया कुमार, हार्दिक पटेल हे ज्या प्रकारे बोलत आहेत, मुद्दे मांडत आहेत, ते उत्तम आहे – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 13

भाजपची आता हवा गेलीय, निवडणुकीत भाजपकडून लोक पैसे घेतील, पण मत देणार नाहीत – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 14

मोदी कुणाचेच ऐकत नाहीत आणि कुणाचेही न ऐकता राज्य चालवता येत नाहीत – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 15

चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात राहाल, मग यूपीचे असो किंवा मराठी असोत, ठोकून काढणारच – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 16

आपली कामं सांगता येत नाहीत, तेव्हा राम मंदिरासारखी भावनिक मुद्दे काढावी लागतात – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 17

जनमानसाच्या मनाचा कानोसा घेतलात, तर कळेल, राम मंदिर हा लोकांचा मुद्दा नाहीय, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुद्दा क्रमांक – 18

आपली कामं सांगता येत नाहीत, तेव्हा राम मंदिरासारखी भावनिक मुद्दे काढावी लागतात – राज ठाकरे

मुद्दा क्रमांक – 19

ते आले, घंटा बडवली आणि परतले, राज ठाकरेंचा अयोध्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंना टोला

मुद्दा क्रमांक – 20

एक लाख कोटी रुपयात भारतातील संपूर्ण रेल्वे नीट होऊ शकते, मग बुलेट ट्रेनवर खर्च का करताय? ज्या गोष्टी करताय, ते लोकांच्या उपयोगी आहे की नाही ते पाहायला हवे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.