26 इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत, पर्यावरण रक्षणासाठी आदित्य ठाकरेंचं आणखी एक पाऊल

72 इलेक्ट्रिकल बस रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील. 26 Electric Buses In Service Of Mumbaikars From Today, Big Announcement Of Thackeray Government

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:37 PM, 4 Dec 2020

मुंबईः मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे फेम 2 योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला प्राप्त झालेल्या 26 इलेक्ट्रिक बसेस गाड्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. बेस्ट ताफ्यात 46 इलेक्ट्रिकल बस आहेत. या 26 नवीन इलेक्ट्रिकल बस बेस्टच्या ताफ्यात आल्यामुळे 72 इलेक्ट्रिकल बस रस्त्यावर धावताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. (26 Electric Buses In Service Of Mumbaikars From Today, Big Announcement Of Thackeray Government)

मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या शहरात 26 इलेक्ट्रिक बसेस आल्या आहेत. एकंदरीत 340 इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.गेले दोन ते तीन वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. अवजड उद्योग खात्यात जेव्हा अनंत गीते होते, त्यानंतर अरविंद सावंत होते. तेव्हापासून याची प्रोसेस सुरू झाली होती. फेम 1 आणि फेम 2 मध्ये आपण या बसेस घेतल्या होत्या. मी, बागडे आणि अजोय मेहता आम्ही सगळे तेव्हा महापालिकेत काम करत होतो. तिघांनी केंद्रात जाऊन तिकडच्या मंत्रिमहोदयांना विनंती केली होती. त्यावेळी कॅपेक्सवर ज्या बसेस होत्या, त्या ओपेक्ससाठीही सुरू कराव्यात, अशी विनंती केली होती, असंसुद्धा आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. (26 Electric Buses In Service Of Mumbaikars From Today, Big Announcement Of Thackeray Government)


मुंबईत 300 इलेक्ट्रिक बसेस धावणार

तसेच काही नियम बदलून आपण मुंबईत 300 बसेसची सुरुवात करत आहोत. 2013 आणि 14ला आपण पहिल्या सहा इलेक्ट्रिक बसेस घेतल्या. कदाचित देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक बसेस असतील, ज्या महापालिका म्हणून वापरत असेल. आता आपण इथे 46 बसेस बघतोय. त्यातील सहा बसेस धावतच असतात. या बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक असून, मुंबईभर चालणार आहेत. 340 बसेसचा हा टप्पा लवकरच भारतात येणार आहे. पुढच्या ज्या काही बसेस खरेदी कराल त्यात ठरावीक वाटा इलेक्ट्रिक बसेससाठी ठेवावा, अशी विनंतीही मुंबईच्या महापौरांना करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. 2013मध्ये रेंज आणि चार्जिंगची वेळ यावर प्रश्न होते, कारण त्यावेळी ते तंत्रज्ञान अद्ययावत होत होते. आता हे तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे, वाढत आहे. मुंबई-पुणे, पुणे- कोल्हापूर, मुंबई-नागपूर या पट्ट्यांवर लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावताना पाहायला मिळतील, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

पर्यावरणाला पोषक असणारी आणि कार्बन मोनॉक्साइड सोडत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही. अपंगांसाठी व्हीलचेअर एक्सेबल आहे. तसेच 334 इलेक्ट्रिकल बस बेस्ट प्रशासनाला मिळणार असल्याचीही माहितीसुद्धा प्रशासनानं दिली आहे.

(26 Electric Buses In Service Of Mumbaikars From Today, Big Announcement Of Thackeray Government)

संबंधित बातम्या

“शरद पवार हे एक विद्यापीठ, त्यांच्याकडून प्रत्येकवेळी शिकायला मिळतं”, आदित्य ठाकरेंचे उद्गार

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात…