BMC Meeting : पावसाळा पूर्वतयारी बाबत मुंबई महापालिकेत विशेष बैठक संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचे आयोजन आज महापालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक 2 येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते‌.

BMC Meeting : पावसाळा पूर्वतयारी बाबत मुंबई महापालिकेत विशेष बैठक संपन्न
पावसाळा पूर्वतयारी बाबत मुंबई महापालिकेत विशेष बैठक संपन्न
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 8:45 PM

मुंबई : येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांसह महानगरपालिका क्षेत्रातील ज्या-ज्या यंत्रणेद्वारे विविध स्तरीय कार्यवाही केली जाते; त्या सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर नियमितपणे कामांची पाहणी करावी. सर्व संबंधित कामे वेळच्या वेळी पूर्ण करावी आणि इतर यंत्रणांसोबत सुसमन्वय साधावा; असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Sing Chahal) यांनी दिले आहेत. त्याचबरोबर विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे उपयोगितांसाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. या ठिकाणचा राडारोडा (Debris) वेळच्या वेळी न हटविल्यास हा राडारोडा पावसामुळे वाहून जाऊन विविध ठिकाणी पाणी तुंबू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळच्या वेळी असा राडारोडा न हटविणाऱ्या संस्थांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित सह आयुक्त व उपायुक्तांना आज दिले आहेत. (A special meeting was held in Mumbai Municipal Corporation regarding monsoon preparations)

इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचे आयोजन आज महापालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक 2 येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते‌. या बैठकीला ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संबंधित सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर आणि विविध यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चहल यांनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

बैठकीच्या सुरुवातीला प्रशासक महोदय यांनी विविध खात्यांनी व यंत्रणांनी केलेल्या पावसाळापूर्व कामांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच विविध पावसाळापूर्व विविध कामे ही निर्धारित वेळापत्रकानुसारच वेळच्यावेळी करण्याचे निर्देश दिले. पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होणाऱ्या ठिकाणी यापूर्वी आदेशित करण्यात आलेल्या नुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ‘मॅन होल’ व संरक्षक जाळ्या याबाबत नियमितपणे पाहणी व पडताळणी करत यासाठी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य खात्याला साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचे आदेश

‘मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित’ व ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (MMRDA) यांच्याद्वारे विविध कामे सुरु आहेत. या अनुषंगाने येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्तरावर सुसमन्वय साधण्याचेही निर्देश दिले. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवर पाणी साचू नये किंवा खड्डे पडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे तसेच या दोन्ही महामार्गांलगत असणाऱ्या ‘कल्व्हर्ट’ची सुयोग्यप्रकारे साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. साथ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्‍यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आवश्यक त्या सर्व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश दिले आहेत. (A special meeting was held in Mumbai Municipal Corporation regarding monsoon preparations)

इतर बातम्या

Video : देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब! विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गिरीश महाजनांबाबत कोणता गौप्यस्फोट?

राज्यात लाखो पदे रिक्त; सरकार नोकर भरती कधी करणार? सरकारमधल्या नेत्याचा सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.