‘अब की बार उद्धव सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार’

मुंबई: शिवसेना-भाजप युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीनंतर चर्चा करुन ते युतीबाबत पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. “जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे, त्यावर चर्चा झाली आहे. आता दोन्ही पक्षाचे प्रमुख […]

‘अब की बार उद्धव सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई: शिवसेना-भाजप युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीनंतर चर्चा करुन ते युतीबाबत पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

“जो शिवसेनेचा फॉर्म्युला आहे, त्यावर चर्चा झाली आहे. आता दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते संध्याकाळी त्याबाबत माहिती देतील. नक्कीच युतीच्या दिशेने पाऊल पडलं आहे”, असं म्हणत  संजय राऊत यांनी ‘अब की बार उद्धव सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार’ असा नारा दिला.

50-50 फॉर्म्युला

लोकसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि भाजपामध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरे आज युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

अमित शाह आज ‘मातोश्री’वर, युतीची घोषणा निश्चित, सेनेच्या 8 अटीत भाजप अडकली!  

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिम शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परीषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून त्यांच्या अटी आणि शर्थी सविस्तर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे. मात्र मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्टं होईल.

मुख्यमंत्री मातोश्रीवर

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चारच दिवसांपूर्वी स्वत: मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी युतीबाबत उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या 

अमित शाह आज ‘मातोश्री’वर, युतीची घोषणा निश्चित, सेनेच्या 8 अटीत भाजप अडकली!  

मुख्यमंत्री म्हणाले – युतीची चर्चा सकारात्मक, पण शिवसेनेचं म्हणणं काय?    

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री भेटीनंतर युती पक्की !   

युतीच्या चर्चांना वेग, मुख्यमंत्री थेट ‘मातोश्री’वर   

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.