मोठी बातमी! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे शरद पवार यांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी अभिनेता शरद पोंक्षे यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.

मोठी बातमी! सावरकर प्रेमी शरद पोंक्षे शरद पवार यांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 9:14 PM

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी अभिनेता शरद पोंक्षे यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे शरद पोंक्षे हे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकेचे धनी बनले आहेत. असं असताना आज त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु असल्याची चर्चा आहे.

शरद पोंक्षे यांनी महत्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची भूमिका मांडणारं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे अनेक प्रयोग राज्यभरात केले आहेत. त्यांच्या या नाटकामुळे त्यांच्यावर गांधीवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी टीका केली जाते.

याशिवाय स्वातंत्र्यवीर सावकर यांचे ते समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील विचार मिळतेजुळते नाहीत. असं असताना त्यांची आणि शरद पवारांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पोंक्षे आणि शरद पवार यांची भेट आज झाली असली तरी त्यांच्या या भेटीमागे काहीतरी महत्त्वाचं कारण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्य परिषदेच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी शरद पोंक्षे आणि शरद पवार यांच्यात भेट झालीय.

दरम्यान, दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झालीय याबाबतची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. याशिवाय शरद पवार आणि शरद पोंक्षे दोघांकडून या भेटीबाबत काही प्रतिक्रिया आलेली नाहीय.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.