भूमीपुत्रांना न्याय कधी मिळणार; वेदांतावरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय प्रश्नांना उत्तर न देता त्यांनी बेरोजगारीवरच लक्ष्य करुन अनेक सवाल उपस्थित केले.

भूमीपुत्रांना न्याय कधी मिळणार; वेदांतावरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 2:56 PM

मुंबईः वेदांता प्रकरण, वर्सोवा सी-लिंक  (Vedanta case, Versova C-Link) आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टिकेली उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्न टाळत त्यांनी बेरोजगारीवरच त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले. वेदांता प्रकरणावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठवत मुख्यमंत्री दिल्लीला आपल्या कामासाठी गेले आहेत की इतर कामासाठी गेले आहेत असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्नांना उत्तर न देता, त्यांनी रोजगार, आणि राज्यातील औद्योगिकीकरणावरच वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली.

राज्यातील होणारी गुंवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या रोजगारामधून सगळ्यात आधी भूमीपुत्रांना न्याय दिला पाहिजे, त्यांना आधी रोजगार मिळाला पाहिजे अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. 70 हजार युवकांना नोकऱ्या मिळणार होत्या मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे असंही त्यांनी सांगितले.

नोकरभरती करायची असेल तर मुंबई, नागपूर, पुणे ही शहरं सोडून युवकांच्या मुलाखती चेन्नईत का घेतल्या जात आहेत असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे. या प्रश्नावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

बल्क पार्कविषयी त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. इतर देशामध्य बल्क पार्क जातात याविषयी दुमत असण्याचे कारण नाही मात्र महाराष्ट्रात बल्क पार्क का झाला नाही असा सवालही त्यांनी केला. आज राज्यात 394 फार्मसी कॉलेज आहेत.

व्हॅक्सीन प्रोडक्शनमध्येही राज्य सर्वोत्तम असतााही राज्यातील नवनवे प्रकल्प इतर ठिकाणी का जातात असा सवाल उपस्थित करुन नोकऱ्यांमध्ये आणि रोजगारात भूमीपुत्रांना पहिल्या प्रथम संधी द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....