मंत्रालयात अजित पवारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव, अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची हजेरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अजित पवार यांनी कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या.

मंत्रालयात अजित पवारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव, अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची हजेरी
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 2:07 AM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपुलकीच्या शुभेच्छा दिल्या. करड्या शिस्तीच्या अजित पवार यांनी कार्यालयातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे वेळ देऊन शुभेच्छा स्वीकारल्या. प्रत्येक कर्मचाऱ्याला अजित पवार यांच्यासोबत वैयक्तिक फोटो काढण्याची संधीही देण्यात आली. अजित पवार यांच्या कार्यालयात कामे तात्काळ मार्गी लागतात, कारण तिथं टीमवर्क म्हणून काम केलं जातं. अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कामाला तिथं प्रतिष्ठा आहे. कार्यालयासाठी प्रत्येक जण आणि त्याचं काम महत्वाचं आहे याची प्रचिती अजित पवार यांच्या वागणुकीतून सातत्यानं येते. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या स्टाफशी केलेल्या प्रेमाच्या संवादातून, वागणुकीतून त्याची अनुभूती पून्हा एकदा आली.

“शुभेच्छा आपुलकीच्या आपलेपणाच्या”

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुसतं नाव ऐकलं तरी करड्या शिस्तीच्या पवारांची करारी छबी डोळ्यासमोर येते. कडक खर्जातला जरब बसविणारा आवाज कानात घुमतो. त्यांची तीक्ष्ण नजर अगदी थेट आर-पार गेल्याचा आभास होतो. मात्र या कडकशिस्तीच्या अजित पवारांच्या ह्रदयातही मायेचा, आपुलीचा झरा आहे. या आपुलकीची, आपलेपणाची प्रचिती उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या सर्व स्टाफने अनुभवली. निमित्त होतं, वाढदिवसांच्या शुभेच्छांचं. अंतरीच्या जिव्हाळ्याचं.

“मंत्रालयात कामकाज संपल्यानंतर कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या शुभेच्छा”

22 जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही प्रत्यक्ष येऊ नये, पुष्पगुच्छ पाठवू नये, गर्दी जमवू नये, असं जाहीर आवाहनच त्यांनी केलं. त्यामुळं त्यांच्या अनेक चाहत्यांची, कार्यकर्त्यांची निराशा झाली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (20 जुलै) दिवसभराचं कार्यालयीन कामकाज संपताना मंत्रालयातल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात अजित पवार यांच्या सर्व बैठका, नियोजित भेटी झाल्यावर कार्यालयातले कर्मचारी नेहमीपेक्षा जास्तच वेळ उगीचच रेंगाळत असल्याचं अजित पवार यांच्या लक्षात आलं.

प्रेमळ दम देत अजित पवारांकडून शुभेच्छांचा स्वीकार

काय आहे? असं नेहमीच्या खास पवार शैलीत त्यांनी विचारलं. त्यावर कुणीतरी अगदी भीतभीतचं काही नाही, शुभेच्छा द्यायच्यात, असं धाडस करुन सांगितलं. त्याला सावरुन घेत तिथं उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयातल्या स्टाफला आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात असं सांगितलं. त्यावर ठिक आहे, चला… असा प्रेमळ दमच त्यांनी भरला.

“सर्वांना एकच न्याय, कोणी मोठा नाही-कोणी छोटा नाही”

मग सुरु झाला ह्रद्य सोहळा. आपुलकीचा आपलेपणाचा. कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अगदी वैयक्तिक स्वरुपाच्या शुभेच्छांचा स्वीकार करत अजित पवारांनी प्रत्येकासोबत फोटो सेशनही केलं. मात्र या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या अगदी चतुर्थश्रेणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून ते अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना एकच न्याय, कोणी मोठा नाही-कोणी छोटा नाही. प्रत्येकानं अगदी रांगेत येऊनच (सोशल डिस्टन्सिंग पाळत) शुभेच्छा दिल्या, त्या त्यांनी तितक्याच आपलेपणाने स्वीकारल्याही.

कोणालाही विशेष सवलत नाही, की विशेष वागणूक नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं समाधानाचं भरतंच यानिमित्तानं पहायला मिळालं. इतर वेळी अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजित पवार यांनी या कार्यक्रमामुळे आपलं वेळेचं नियोजन बिघडणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली होती.

हेही वाचा :

‘महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही’, अजितदादांना भाजपचं प्रत्युत्तर

गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का?; अजितदादा जेव्हा भडकतात…

कोरोना काळातील अनाथांसाठी राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात

व्हिडीओ पाहा :

Ajit Pawar accept Birthday wishes from staff of Ministry in Mumbai

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.